Sharad Pawar Retirement News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांनी पायउतार होण्याचा निर्णय अचानक निर्णय घेतल्यानंतर यावर विचार करुन यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे.
या समितीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे, जयंत पाटील, अजित पवार (Ajit Pawar), हसन मुश्रीफ, सुप्रिया सुळे (Supriya Sule), जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ही समिती विचार करुन पुढील निर्णय घेणार आहे.
दरम्यान, पवार यांनी पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कार्यकर्त्यांनी तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर धरणे धरले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांची भावना पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांची भूमिका सांगितली. पुढील दोन - तीन दिवसात साहेब आपल्या निर्णयावर फेरविचार करुन भूमिका मांडतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मात्र, पवार यांची भूमिका काय असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये काय घडामोडी घडू शकतात, यावर राजकीय जाणकरांनी अनेक शक्यता व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार (Sharad Pawar) आपली भूमिका बदलून ते अध्यक्ष राहू शकतात. तसेच कार्यकारी अध्यक्षांची निवड करु शकतात. त्या पदावर सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची नियुक्ती होऊ शकते. किंवा इतर नावही समोर येऊ शकतात.
कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याचा विचार करता पवार हे अध्यक्ष पदावर काय राहून काही नेत्यांवर सामूहीक जबाबदारी देऊ शकतात. किंवा पूर्णपणे बाजूला होऊन, नवीन अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. पवार फक्त त्यांना मार्गदर्शन करतील, अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पवार यांनी पदावर कायम राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्व नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.