Sharad Pawar Supports Vidyanand Bapat Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : विद्यानंद बापटांच्या भूमिकेला शरद पवारांचे समर्थन; स्पष्टच सांगितलं, 'मुद्दा योग्य...'

Sharad Pawar reaction to Vidyanand Bapat: गणेशोत्सवात डीजे बंदीवर करण्याची मागणी करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समर्थन केले आहे.

Roshan More

Vidyanand Bapat controversy Sharad Pawar: 'सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेचे आवाज आणि त्यावर रस्त्याचे कार्यक्रम याच्यामुळे या सणाचं गांभीर्य जायला मदत होते.

विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही परंतु त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.', असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. 'गणेश उत्सवाची परंपरा आहे मात्र चुकीच्या गोष्टीवर बापट मत व्यक्त करत आहेत, त्यांच्या भुमिकेला माझं समर्थन आहे.', असे देखील ते म्हणाले.

बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'कोणीतरी या संदर्भात मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं हा लोकशाहीवर हल्ला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि इतर घटक आहेत त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बापटाच्या हल्ल्याचा ज्यांनी निषेध करणाऱ्यांच्या सोबत मी आहे.हल्ले थांबायला पाहिजेत नाही तर सक्तीचे धोरण स्वीकारले पाहिजेत.'

मारहाण निषेधार्ह

बापट यांना मारहाण झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यांशी फोनद्वारे संपर्क साधला होता. सुळे यांनी ट्विट करत सांगितले की, त्यांना काही व्यक्तींनी केलेल्या मारहाणीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.

आपल्याला एखाद्याचे मत मान्य नसले, तरी त्या मताचा आणि ते मांडण्याच्या अधिकाराचा आदर व्हायला हवा. वैचारिक मतभेदांना हिंसेने उत्तर देण्याची ही पद्धत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि पुरोगामी परंपरेला अजिबात शोभणारी नाही. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

संतोष चव्हाणला अटक

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. संतोष चव्हाण हा कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून, तेथील एका गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याची माहिती आहे.

त्याच्याविरोधात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बापट यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाणच्या पूर्वीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT