Atul Benke-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

NCP News : ...अखेर जुन्नरमध्ये बेनकेंच्या विरोधात शरद पवारांनी आपला हुकमी पत्ता काढलाच

Sachin Waghmare

Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता जागावाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार का याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै 2023 मध्ये महायुतीमध्ये शरद पवारांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा निवडणूक लोकसभेची झाली. त्या निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे महायुती खडबडून जागी झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अतुल बेनकेंना घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना घेरण्यासाठी शरद पवारांच्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांनी अनेक मोहरे मैदानात उतरवले आहेत.

दरम्यान, काही ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवार आयात करत असताना शरद पवार यांनी आता जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात नवा चेहरा मैदानात उतरवणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

या ठिकाणी शरद पवार यांनी नवी खेळी खेळली आहे. त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी शरद पवार नव्या शिलेदाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मोहित ढमाले 2017 ते 2022 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

मोहित ढमाले यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर ठामपणे शरद पवार यांची साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते. मोहित ढमाले पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी यांनी केली आहे.

विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार हे मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणून मोहित ढमाले यांनी ओळखले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT