Ichalkaranji BJP News : इचलकरंजीत भाजपला धक्का? माजी जिल्हाध्यक्षांनी घेतली शरद पवारांची भेट!

Sharad Pawar and Hindurao Shelke met : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चेला सुरूवात झाली आहे.
Sharad Pawar Hindurao Shelke
Sharad Pawar Hindurao ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji Vidhansabha Election : इचलकरंजीच्या राजकारणात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी होत असतानाच भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीमुळे इचलकरंजीतील राजकारणांत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे(BJP) प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे ते निकटचे सहकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात परिचीत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधातही त्यांनी प्रदीर्घ काळ इचलकरंजीत राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पवार यांच्या भेटीमागे अनेक तर्क - वितर्क लावले जात आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चेला सुरूवात झाली आहे.

Sharad Pawar Hindurao Shelke
Dhananjay Mahadik to Rahul Gandhi : शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापुरात येणाऱ्या राहुल गांधींवर महाडिकांची प्रश्नांची सरबत्ती!

इचलकरंजीतील राजकारणात शेळके यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. ते माजी नगराध्यक्ष आहेत. सुरुवातीच्या काळात ते खासदार माने गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. कालांतरांने ते भाजपमध्ये दाखल झाले. फडणवीस(Devendra Fadnavis) शासनाच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदावर काम केले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळेच त्यांना आमदार आवाडे यांच्या विरोधात विधानसभेला भाजपने उमेदवारी दिली होती. पण छाननीत त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

सध्या अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. कोणत्याची क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आमदार आवाडे यांनी कांही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी इचलकरंजी भाजपमध्ये त्यांच्या विरोधात काम करणा-यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सध्या अस्वस्थ असलेल्या दुस-या फळीतील नेत्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काल शेळके यांनी सांगली येथे शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे वृत्त पसरताच शहरातील राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत. आठवड्याभरातील ही दुसरी मोठी राजकीय घडामोड आहे. या घडामोडीकडे विशेषतः महाविकास आघाडीचे लक्ष लागून राहिले होते.

Sharad Pawar Hindurao Shelke
Ramdas Athawale offer to Prakash Ambedkar : रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिली मोठी ऑफर, म्हणाले...

सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदन कारंडे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यानुसार त्यांनी प्रचाराची आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच शेळके - पवार भेटीने शहरातील राजकारणाची दिशाच बदलण्याची शक्यता आहे. मात्र पक्षप्रवेशावर अथवा संभाव्य उमेदवारीवर पवार यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याची माहिती शेळके यांनी `सकाळ`शी बोलतांना दिली आहे. विशेष म्हणजे आपणास भेटण्यास दोनवेळा निरोप आला होता. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली असून राजकारणांवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com