Pune Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केले जात आहे. हडपसरमध्ये फटाक्यांची आतिशबाजी करत आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं गेले. गेल्या अनेक दिवसापासून तटस्थ असलेले हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी यावेळी अजितदादांच्या स्वागतासाठी हजेरी लावली. तुपे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी अजितदादांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याने त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे चेतन तुपे आगामी काळात शरद पवार यांची साथ सोडणार का याबाबत चर्चा रंगली आहे. (Latest Political News)
उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते १०६ फुटी ध्वजाचा लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे अजित पवार यांच्यासोबत होते. मात्र चेतन तुपे यांची भूमिका अद्याप तटस्थ आहे. ते नेमके कुणासोबत आहेत, हे चेतन तुपे यांनी स्पष्ट केलेलं नाही, मात्र अजित पवारांच्या स्वागताला त्यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगळाच सूर ऐकावयास मिळत होता.
आतापर्यत कामाच्या निम्मिताने चेतन तुपे अजितदादांना भेटत होते. मात्र आज कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. त्यामुळे तुपे आगामी काळात शरद पवार यांची साथ सोडणार का याबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान, काही आमदारांनी स्पष्ट भूमिका घेत साहेब किंवा दादा गटात सहभागी झाले, मात्र भूमिका न घेतलेले आमदार चेतन तुपे (Chetan Tupe), अशोक पवार, अतुल बेनके शरद पवार यांच्यासोबत असल्याचे बोलले जात होते. मात्र आजच्या तुपेंच्या कृतीमुळे राष्ट्रवादीत कोण कुठल्या गटात आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.
अजित पवार सोमवारी दिवसभर पुण्यात असणार आहेत. विविध कार्यक्रमांचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार आहेत. भव्य ध्वजाचं लोकापर्ण पार पडलं आहे. गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक होत आहे. या बैठकीलाही अजित पवार उपस्थित असतील.
पुण्यात आज पार पडणार जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. गणेशोत्सवा संदर्भात ही महत्त्वाची बैठक होतेय.तसंच संध्याकाळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमालाही अजित पवारांची उपस्थिती असेल.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.