Bhagirath Bhalke Visit : 'बीआरएस' प्रवेशाची घाई केली ? भगीरथ भालके-काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या चर्चेने खळबळ

Congress And BRS in Solapur : "बीआरएस प्रवेशाची घाई केली, काँग्रेस तुमच्या जवळची"
Bhagirath Bhalke in Congress Office
Bhagirath Bhalke in Congress OfficeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : राज्यातील राजकीय वातावरण कधी बदलेल याचा काही नेम नाही. आज एकत्र असलेले नेते उद्या कुठे जातील याचा अंदाज गेल्या वर्षभरात कुणालाही आला नसल्याचे स्पष्ट झाले नाही. राष्ट्रवादीला धक्का देत भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) प्रवेश केलेले भगीरथ भालके यांनी रविवारी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना 'बीआरएस' प्रवेशाला घाई केल्याचे सांगितले. तुम्ही पुनर्विचार करावा' असेही ते म्हणाल्याची माहिती आहे. यामुळे भालकेंना काँग्रेसने अप्रत्यक्षरीत्या प्रवेशाचे आमंत्रणच दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या भेटीने मंगळवेढा-पंढरपूरसह सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार (Sharad Pawar) शरद पवारांनी पंढरपूर दौऱ्यात संभाव्य उमेदवार म्हणून अभिजीत पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. भरत भालकेंच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ यांना एक लाख पाच हजार मते मिळालेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याने भालके राजकीयदृष्ट्या अस्थिर झाले. यातूनच त्यांनी थेट सोडचिट्टी देत राष्ट्रवादीतून 'बीआरएस'ची वाट धरल्याचे बोलले जाते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित शक्ती प्रदर्शन करीत भगीरथ भालकेंनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला. 'बीआरएस'ला भालकेंच्या राजकीय ताकदीचा अंदाज आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Bhagirath Bhalke in Congress Office
Praniti Shinde News: काँग्रेस सोलापुरातील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत; 'भावी खासदार'चा झळकला 'बॅनर' !

दरम्यान, तालुका काँग्रेसमध्ये पुनर्रचना करून वेगवेगळ्या समाजाला प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायचीच असा इरादा केलेल्या काँग्रेस सोलापुरात जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवेढ्यातील 'बीआरएस' आणि काँग्रेसचे ऑफिसचे अंतर कमी आहे. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मध्यवर्ती ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू केले. काँग्रेसची जनसंवाद यात्रा मंगळवेढ्यात येणार असल्याने या कार्यालयात सध्या भेट देणाऱ्याची संख्या वाढू लागली.

अशा परिस्थितीत 'बीआरएस' नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनीही काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष मनोज माळी, पांडुरंग जावळे, विष्णु शिंदे, मारूती वाकडे, अमोल म्हमाणे, शिवशंकर कवचाळे, नाथा ऐवळे आदी उपस्थित होते. त्यांनी भालकेंशी दिलखुलास संवाद साधला. 'तुम्ही काँग्रेसमध्ये येण्याबाबत विचार करावा. काँग्रेस पक्षाचे आपले परिवाराशी संबंध आहेत. पक्षप्रवेशाची घाई करावयास नको होती', अशीच त्यांच्यात चर्चा झाली आहे.

Bhagirath Bhalke in Congress Office
Ajit Pawar Beed Sabha : काळे झेंडे ते रिकाम्या खुर्च्या ; अजित पवारांच्या सभेत काय घडले ?

'बीआरएस'ने भगीरथ भालके यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवलेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाबद्दल पुनर्विचार करावा याबद्दल मांडलेल्या भूमिकेचा फेरविचार करणार का ? दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नाराज गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४च्या पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत काय राजकीय घडामोडी घडतील, याचा व भगीरथ भालके यांच्याबद्दलही राजकीय कानोसा घेतला आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात या वर्षभरात घडणाऱ्या घडामोडी लक्षवेधक ठरणार हे मात्र नक्की..!

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com