Sharad Pawar, Supreme Court Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : EVM च्या विरोधात MVA सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवारांच्या नेतृत्वात लढा उभारणार

Sharad Pawar Leads fight Against EVM : पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 विधानसभा मतदारसंघातील पराभूत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातून महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आघाडीतील नेते सातत्याने ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत आहेत.

ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी लढा उभारण्याचे ठरवलं आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या पुण्यातील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातून भाजपने 9 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या तर शिंदेंच्या शिवसेनेला एक आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराला एका ठिकाणी यश आले आहे. महाविकास आघाडीला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा यंदा पराभव झाला. यामध्ये भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेकांचा पराभव झाला. यामुळे पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 विधानसभा मतदारसंघातील पराभूत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

परंतु हे पराभूत उमेदवार इतक्यातच न थांबता आता या उमेदवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज पुण्यातील महाविकास आघाडीचे बहुतांश पराभूत उमेदवार हे दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

ईव्हीएम विरोधातील आकडेवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर करून अंकांमधली असणारी तफावत सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

हे सर्व पराभूत उमेदवार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. उद्या (मंगळवार) या उमेदवारांना घेऊन शरद पवार अभिषेक मनुसंगवी यांच्याकडे जाणार आहेत. त्यानंतर याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT