Tamil Nadu Scientist Cheated: RSS चा 'खासदार' अटकेत; राज्यपाल पदाचं आमिष दाखवून शास्त्रज्ञाची 5 कोटींची फसवणूक

Nashik Police Niranjan Kulkarni Arrested: राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवित कुलकर्णी याने तामिळनाडूतील व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांची पाच कोटींची फसवणूक केली.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राज्यात महायुतीचे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच राज्यपाल पदाचे आमिष दाखवून एका शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एकाला नागपुरातून अटक केली आहे, त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी (वय ४०, रा. गंधर्व नगरी, नाशिकरोड) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी निरंजन कुलकर्णी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण विभागाचा कार्यकर्ता होता.काही महिन्यांपासून तो संघटनेत सक्रीय नसल्याची माहिती आहे. त्याच्या कारवर ‘खासदार’ असा शासकीय लोगो होता.

Crime News
Eknath Shinde : वर्षावर रात्री खलबतं; १० कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं शिंदेंना मिळणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून तो समाजात राजकीय दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असे. राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवित कुलकर्णी याने तामिळनाडूतील व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांची पाच कोटींची फसवणूक केली.

Crime News
Pune Guardian Minister: पालकमंत्री पदासाठी महायुतीचा फॉर्म्युला; अजितदादा पुण्यावरील दावा सोडतील का?

७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत रेड्डी यांनी निरंजन कुलकर्णी याला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले. त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँक खात्यात जमा केले आहे.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर रेड्डींनी त्याच्याकडे पैसे परत मागितले. कुलकर्णी याने त्यांना पैसे परत न देता फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रेड्डी यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार नाशिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन कुलकर्णी याला अटक केली. रविवारी (दि. ८) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com