Sharad Pawar Narendra Modi  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Reply To Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या गंभीर आरोपावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, '' हीच गोष्ट त्यांना...''

सरकारनामा ब्यूरो

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये भाषण करत होते. भोपाळमध्ये मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी “राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या पक्षावर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचा हल्लाबोल केला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देतानाच मोदींना टोला लगावला आहे.

शरद पवार( Sharad Pawar) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानाच्या टीकेवर भाष्य केलं. पवार म्हणाले, देशातील विरोधी पक्षातील नेते मोठ्या संख्येने एकत्र येतात. देशाच्या समस्यांबाबत चर्चा करतात, हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली नसावी. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत चुकीचे वक्तव्य केले असावे. परंतू, पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः:च विचार करण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं.

पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे, याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी माझ्याबाबत शिखर बँकेचा उल्लेख केला आहे. पण मी शिखर बँकेचा कधीही सभासद नव्हतो आणि आजही नाही. त्यामुळे सभासदच नसेल तर, कर्ज घेण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. तेव्हा याबाबत बोलणे कितपत ठीक आहे?

शिवाय सिंचनाबाबत वक्तव्य केलेल्या वक्तव्यातही फारसे तथ्य नाही. त्यांनी उल्लेख केलेले शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही, हे स्पष्ट झालेले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव त्यांनी घेतले आहे. मात्र, सुळे या अशा इन्स्टिट्यूटसबरोबर कधीही राहत नाहीत, हे अनेक लोकांना माहीत आहे. एका जबाबदार पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीचे विधाने करू नाहीत. तरीही ते अशा पद्धतीचे विधाने केली जातात. त्यांच्याबाबत यापेक्षा अधिक काही बोलण्याची गरज वाटत नाही असंही पवार यावेळी म्हणाले.

मोदी नेमकं काय म्हणाले होते..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) वर गंभीर आरोप केला आहे. मोदींनी आज राष्ट्रवादीवर तब्बल 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी यांनी कथित शिखर बँक घोटाळा, जलसिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

मोदी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या पक्षावर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी यांची मोठी यादी आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT