Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Sabha : शरद पवारांची सभा आंबेगावात नाही, तर जुन्नरमध्ये १ ऑक्टोबरला होणार; पण...

उत्तम कुटे

Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील हे त्यांना सोडून गेल्याने त्यांच्या मतदारसंघात पहिली सभा घेण्याची चर्चा रंगली हाती. मात्र, आंबेगाव सोडून इतरत्र पवारांच्या सभा होत आहेत. आताही आंबेगावऐवजी जुन्नर तालुक्यात ता. १ आक्टोबर रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. (Sharad Pawar's Sabha will not be held in Ambegaon, but in Junnar on October 1; But...)

शरद पवारांना सोडून गेलेले त्यांच्या विश्वासातील दुसरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या येवल्यापासून या सभा सत्रांचे रणशिंग त्यांनी फुंकले. त्यानंतर अजित पवारांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा घेतली. अजित पवारांनीही लगेच बीडमध्ये सभा घेतली.

आंबेगावात या महिन्यात शरद पवारांची सभा होऊन त्यांनी भुजबळांवर येवल्यात ज्या प्रमाणात तिखट शब्दांत हल्लाबोल केला. त्याच पद्धतीने आंबेगावात सभा घेऊन वळसे पाटील यांच्यावर करणार होते. पण, आता ही सभा दिवाळीत होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर शिरूरमध्येही सभा घेणार आहेत.

शरद पवारांची सभा तूर्त आंबेगावात होणार नसली, तरी ती जुन्नरमध्ये १ ऑक्टोबरला होणार आहे. तेथील राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांचीही तळ्यातमळ्यात भूमिका आहे. त्यामुळे तेथे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठीच्या सभा सत्रांतील ही सभा नाही, तर बिरसा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी समाजासाठी पवारांची सभा आहे, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार) नवनियुक्त पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी आज `सरकारनामा`ला सांगितले.

पवारसाहेब हे आंबेगावच नाही, तर शिरूर विधानसभा मतदारसंघातही सभा घेणार आहेत. त्याच्या तयारीला लागण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. पक्ष तथा संघटना जुनीच असली, तरी सध्या तिची नव्याने बांधणी करायची असून, त्यासाठी जुन्यांसह यंग ब्रिगेडलाही पक्षामागे उभे कराय़चे आहे, त्यासाठी त्यांना ताकद देणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या नियुक्तीवर दिली.

सामान्य जनता ही पवारसाहेबांच्या मागे ठामपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, जुन्नरमधील बिरसा ब्रिगेडच्या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा पक्षाचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी सोमवारीच घेतला. त्यांनी आंबेगावची पवारसाहेबांची सभा दिवाळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT