Shrirampur News : मुळा-प्रवरा संस्थेसाठी प्रयत्न चालू आहेत. संस्थेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. सहकार संपला तर शेतकरी व सामान्य माणूस संपेल. राजकारण संपले तर कोणी संपत नाही. राजकारणासाठी सहकार संपविण्याचे पाप कोणी केल्यास त्याला आपल्या पापाची परतफेड परमेश्वर याच आयुष्यात करायला लावेल, असा इशारा मुळा-प्रवराचे माजी अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. (For whom we fight; They also do not stand by us : Sujay Vikhe expressed regret)
मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेची वार्षिक सभा श्रीरामपूर येथील मातोश्री सांस्कृतिक भवनात प्रशासक तथा राहाता येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या सभेत खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. टी. पाटील उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले की, राजकारणामुळे एखादी सहकारी संस्था कशी संपुष्टात येते, याचे मुळा-प्रवरा उत्तम उदाहरण आहे. सहकारात राजकारण आल्यानंतर सर्वात मोठी हानी मुळा-प्रवरा जाण्याने राहाता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील शेतकरी, सभासद तसेच महावितरणच्या विविध अडचणींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची झाली. अजूनही सहकारातील राजकारण थांबायला तयार नाही. राहुरी कारखाना चालविला, तर आमच्यावर आरोप होतात. मात्र, ज्यांच्यासाठी आम्ही भूमिका घेतली ते सभासद, कर्मचारी आमच्या बाजूने उभे राहत नाहीत, हा आजचा सहकार आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार टिकविण्याची भूमिका घेतली. संस्थेच्या लढाईत आठ वर्षे त्यांनी संघर्ष केला. हा संघर्ष यापुढेही चालू ठेवू, अशी ग्वाही देत डॉ. विखे यांनी मुळा-प्रवरा, राहुरी कारखाना येथे ज्यांनी न्यायालयात जाऊन प्रशासक आणले, त्यांचेही या वेळी आभार मानले.
सर्वांच्या संमतीने विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. माजी संचालक अंबादास ढोकचौळे, इंद्रनाथ थोरात, जलीलखाँ पठाण, सिद्धार्थ मुरकुटे, संजय छल्लारे, दीपक शिरसाठ, अनिल भट्टड, मच्छिंद्र अंत्रे, चित्रसेन रणवरे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नानासाहेब पवार, अभिषेक खंडागळे, विठ्ठल राऊत आदी उपस्थित होते.
‘तुम्ही ठरविल्यास अशक्य काही नाही’
राज्यात आणि केंद्रात आपले सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यास सहकार्य करतात. तुम्ही आणि राधाकृष्ण विखे यांनी ठरविले तर अशक्य काही नाही. रोजगार गेलेल्या कामगारांच्या हिताचा विचार कून संस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी संस्थेचे माजी संचालक संजय छल्लारे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.