Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्यभरात सुरू करण्यात आला आहे. सरकार जोरदारपणे काम करीत आहे. मात्र, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्यामुळे आमची सत्तेची गाडी सुसाट सुटली आहे. राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या जेजुरीतील कार्यक्रमात आम्ही खंडेरायाचा भंडारा उधळत राज्यातल्या बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, असे साकडे घातले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, विठोबा आणि खंडोबाला मागणी केली की पूर्ण होते. जेजुरीत सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी काम करणार असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. आता लोकांनी चकरा मारायच्या नाहीत. आता शासन थेट लोकांपर्यंत जात आहे. आपण एका-एका जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांपर्यंतची कामे केली आहेत. येत्या तीन वर्षात शेतकऱ्यांना सोलरवर वीज देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
महिलांना आपण एसटीमध्ये अर्ध्या पैशात तिकीट केले आहे. शिक्षक सेवक आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आवास योजनेच्या माध्यातून पाच लाख घरे देणार आहोत. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. पुण्याच्या रिंगरोडचे काम सुरु आहे. सिंचनाच्या योजना सुरु आहेत. अजितदादा त्या बाबात बोलले आहेत. मी शब्द देतो, पुण्यातील सगळ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असेही फडणवीसांनी सांगितले.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचे आहे. पुरुषांना पैसे दिले की ६० ते ७० टक्केच परत येतात. पण महिलांना पैसे दिले की १०० टक्के पैसे परत येतात. त्यामुळे महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. महिलांना आता जास्त पैसे द्यायचे आहेत. मुलगी जन्माला आली की ते कुटुंब लखपती होणार आहे. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून कुणीही बेघर राहणार नाही. सगळ्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवल्या जात आहेत. मोठ्या महापालिका सांडपाणी प्रकिया करून पाणी वापरता येईल, त्या बाबतीतही काम सुरु आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.