Baramati News: राज्यात ज्या पद्धतीने महानगरपालीकांच्या निवडणूकांना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीबरोबर आम्ही एकत्र आलो, त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही आम्ही अजितदादांबरोबर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं प्रचंड पैशांचा वापर केला, नको त्या गोष्टी करून निवडणुका जिंकल्या आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महापालिका निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बारामती-शारदानगर येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पत्रकारांशी बोलत होते. दुसरीकडे, महापालिका निवडणकांमधील पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. शेवटी मतदारराजा हाच सर्वोच्च असतो. त्याने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. तसेच, 'ईव्हीएम'विषयीदेखील मला काहीही बोलायचे नाही. कारण, पराभव होताच 'ईव्हीएम'ला दोष द्यायचा आणि विजय झाल्यास गप्प राहायचे हे मला मान्य नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, " या निवडणुकींमध्ये निर्णयाचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले होते. स्थानिक स्थिती पाहून ज्याने त्याने निर्णय घेतले आहेत. या निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या. मी मनापासून भाजपचे अभिनंदन करतो. काय चुकले त्याची माहिती घेऊ, पण पराभवाने खचून जायचे नसते.
आता स्थानिक पातळीवर महायुतीमधील कार्यकर्ते काही आरोप करीत आहेत. कार्यकर्ते आपापल्या भावना मांडत असतात. पण राज्यात आम्ही महायुती म्हणूनच काम करतो आहोत. केंद्रात व राज्यात युती आहे व यापुढेही महायुती कायम राहील."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली. ते म्हणाले, “ जनतेची इच्छा नसतानाही ईव्हीएमचा वापर झालेला आहे. निकालांविषयी अनेक ठिकाणी शंका आहेत. त्यामुळे यापुढील निवडणुका 'इव्हीएम'ऐवजी मतपत्रिकेच्या आधारेच घेण्याची आमची मागणी कायम राहील.”
ईव्हीएमचा वापर न करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे विविध पक्षांनी यापूर्वीच केली होती. या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर आयोगाला टाळता आला असता, असे स्पष्ट करीत जयंत पाटील म्हणाले, अनेक ठिकाणी ईव्हीएम मतांमधील फरक स्पष्टपणे जाणवला. त्यामुळे लोकांच्या शंका कायम राहिल्या आहेत.
यापुढील निवडणुका आता केवळ मतपत्रिकांच्या आधारे व्हाव्यात व तशी मागणी विरोधी पक्षांकडून आग्रहाने केली जाईल. एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, या निवडणुकांमध्ये मुंबईसह सर्व विरोधी पक्ष्यांनी एकजुट ठेवणे गरजेचे होते. तसे झाले असते तर निवडणुकांमधील चित्र निश्चितपणे वेगळे दिसले असते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, “एक परिवार म्हणून आम्ही सारे एकत्र आहोत. परिवाराचे घटक म्हणून आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.