Dr. Amol Kolhe VS Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Amol Kolhe: 'आपल्यालाच का टार्गेट केलं जातंय ?' कोल्हेंचा सवाल; मोदी, अजित पवार गटावरही केले गंभीर आरोप

Dr. Amol Kolhe VS Ajit Pawar: अजित पवार का टार्गेट करत आहेत ? अमोल कोल्हेंचं मोठं विधान

Ganesh Thombare

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यात 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'शेतकरी आक्रोश मोर्चा' हा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

या मोर्चात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत अजित पवार गटाकडून आपल्याला का टार्गेट केलं जातंय ? याबाबत भाष्य करत मोदी सरकारवर आणि अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना थेट निवडणुकीत पाडण्याचे चॅलेंज दिले होते. तसेच कोल्हेंविरोधात लोकसभेला तगडा उमेदवार देण्याचंही ते म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता यावर खासदार कोल्हे यांनी उत्तर देत 'मलाच कळत नाही, अजितदादा मला टार्गेट का करत आहेत ? मलाही हा प्रश्न पडला आहे. खरं तर कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने अजूनही अजित पवार गटाला सरकारमध्ये सामावून घेतलेले नाही. मग टार्गेट का केलं जातंय ? असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केला. तसेच अजित पवार गटाला असं बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय का ? असा संशय देखील कोल्हेंनी व्यक्त केला.

कोल्हे म्हणाले, 'हे टार्गेट करत असताना असं वाटतं की, या सर्वांकडून फार अपेक्षा आहेत. अनेक वर्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम केलेलं आहे. शरद पवारांची शेतीविषयक धोरण, शेती विषयी असणारा कळवळा, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे या नेत्यांना (अजित पवार गटाला) बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे का ? हे बोलण्यासाठी या नेत्यांवर दबाव टाकला जातोय का ?', असे अनेक सवाल खासदार उपस्थित करत कोल्हेंनी गंभीर आरोप केले.

'भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'बाबत विधान करून भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी कसा आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे आता इतरांवर कदाचित अशा पद्धतीने बोलायला सांगितलंय का ?', असंही अमोल कोल्हे म्हणाले.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT