Purandar Gram Panchayat
Purandar Gram Panchayat 
पुणे

Purandar Gram Panchayat : एकनाथ शिंदेचा मेळावा होताच विजय शिवतारे यांनी दाखवून दिलं

सरकारनामा ब्युरो

पुरंदर : राज्याताल सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने (Eknath Shinde) मोठी बाजी मारली आहे. पुरंदर तालुक्यात सिंगापूर व बहिरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या दोन्ही ग्रामपंचायत निवडणूकीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली. (Purandar Gram Panchayat Election)

सिंगापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेने सातपैकी पाच जागा मिळवल्या. बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागांवर बाजी मारत सेनेने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी दोघेही एक होऊनही त्यांना अवघ्या दोन जागांवर सामाधान मानावे लागले.

निवडणूकांच्या निकालाबाबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि शाखाप्रमुख विक्रांत पवार म्हणाले की, स्वर्गीय शंकरराव उरसळ यांच्या आशीर्वादाने आम्हाला ग्रामपंचायतीत एवढे घवघवीत यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी यापुढे आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवडमध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर जनतेने त्यांना दिलेली ही पहिली सकारात्मक प्रतिक्रिया आहे. तर विजय शिवतारे यांनीही या विजयावर आपली भूमिका मांडली आहे. आमदार नसलो तरी आगामी काळात पुरंदर हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे.

- सिंगापूर ग्रामपंचयातीतील विजयी उमेदवार

१) विक्रांत पवार, २) सौरभ लवांडे

३) अर्चना लवांडे, ४) विशाल लवांडे

५) संगीता वारे, ६) चांगुणाबाई वाघमारे

७) मीना उरसळ

- बहिरवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार

१) शरद पढेर, २) संगिता भगत

३) दशरथ जानकर, ४) पूजा चिव्हे

५) अमोल भगत, ६) सुजाता भगत

७) स्वाती कोकरे.

दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी पुरंदरमधे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस, महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. '' उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस सोबत युती करून शिवसैनिकांवर आणि शिवसेनेच्या मतदारांवर अन्याय केला. धोका केला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी सेनेच्या आमदारांना काय दिलं? पुरंदरच्या पिण्याच्या पाण्यासाठी २५ कोटी तुम्ही देऊ शकले नाही. मात्र बारामतीच्या एसटी स्टॅन्डला द्यायला २०० कोटी आपल्याकडे होते, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी ठाकरेंवर टीका केली.

ठाकरे यांनी आम्ही ज्या राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस सोबत २० वर्षे संघर्ष करत मतदारसंघ बांधले. या संघर्षात जे मतदार आमच्या सोबत होते त्यांनी या संघर्षात आपले डोके फोडत संघर्ष करत आमच्यासोबत राहीले त्या मतदारांचा तुम्ही अपमान केला. धोका केला. म्हणून हा प्रकार झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या रूपान आता देव भेटला आहे. नाहीतर पुढच्या अडीच वर्षात काय झालं असत माहित नव्हतं. महाविकास आघीडी सरकार हे नतद्रष्ट सरकार होतं. यांनी लोकांवर अन्याय केला. परिसरातील शेतकऱ्यांकडून वाढीव सबसिडी घेतली. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने पुन्हा शेतकऱ्यांना १९ टक्क्यांनेच पाणी मिळणार आहे. जे त्यांना ३ वर्षात नाही जमलं हे यांनी ३० दिवसात पूर्ण केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT