Sangli Crime एक लाखांची लाच घेणारा अभियंता रंगेहात पोलिसांच्या जाळ्यात

Sangli Crime | या दोघांनी टेंडर देण्यासाठी ४ टक्क्यांनी लाच मागितली होती.
सूर्यकांत नलवडे | राहुल कणेगावकर
सूर्यकांत नलवडे | राहुल कणेगावकर
Published on
Updated on

सांगली : सांगलीतील ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यवसायिक राहुल कणेगावकर यांना एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या दोघांनी टेंडर देण्यासाठी ४ टक्क्यांनी लाच मागितली होती. या प्रकरणी सूर्यकांत नलवडे आणि राहुल कणेगावकर यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Sangali Crime news update)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील वारणाली वसाहतीमधील अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीसाठी स्वच्छता कर्मचारी पुरविण्याचे टेंडर काढण्यात आले होते. हे टेंडर देण्यासाठी १ लाखांची लाच घेताना नलावडे आणि त्याचा सहकारी कणेगावकर यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये ही कारवाई केली.

सूर्यकांत नलवडे | राहुल कणेगावकर
Tejas Thackeray राजकारणात येणार? आता आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...

या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कंत्राटदाराने याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. एका खाजगी कंत्राटदाराला वारणाली वसाहत, पाटबंधारे ऑफिस परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्तीसाठी स्वच्छता कर्मचारी पुरविण्याचे टेंडर मिळाले होते. पण टेंडरची वर्क ऑर्डर देण्यासाठी नलावडे यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर कंत्राटदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर विभागान सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com