Shivajirao Adhalrao, Mahesh Landge  Sarkaranama
पुणे

Shirur Lok Sabaha Election 2024 : शिरुर लोकसभेसाठी 'या' दोन दादांमध्ये काँटे की टक्कर ?

Uttam Kute

Pimpri News : आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षात चुरस पाहवयास मिळत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला होता. त्यामुळे त्यांच्या मनात जिंकून येणारा कोण उमेदवार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अजितदादांनी डॉ. कोल्हेंचा पराभव करण्याचे चॅलेंज दिले असल्याने त्यासाठी ते शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव आणि सध्या भाजपमध्ये असलेले प्रदीप कंद यांची घरवापसी करुन घेतील,अशी चर्चा आहे. परिणामी महायुतीच्या उमेदवारीची चुरस शिरुरमध्ये प्रचंड वाढली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचा उमेदवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मिळणार आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने तेथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) यांचे नाव घेतले जात आहे. तर, भाजपला ही जागा मिळाली, तर आपण तयारीत असल्याचा पुनरुच्चार भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केला आहे. त्यामुळे तेथे महायुतीत ही जागा कोणाला मिळते. त्यावर तेथे कोण दादा उमेदवार असणार हे ठरणार आहे. (Lok Sabaha Election 2024 News)

दुसरीकडे महायुतीचा उमेदवार कोणी का ? असेना केंद्रातील सत्ता आणि नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकसाठी शिरुर जिंकण्याचा पक्का आणि मोठा निर्धार भाजपाने यावेळी केला आहे. त्यासाठी या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांनी सोपविली आहे.

त्या जोडीने आजपासून उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी शिरुरसह पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा क्लस्टर दौरा सुरु केला. त्यात त्यांनी प्रथम शिरुरची कोअऱ कमिटी, निवडणूक तयारी समिती आणि मंडलाध्यक्षांची राजरत्न हॉटेल, भाम, चाकण (ता. खेड) येथ बैठक घेतली. ही जागा निवडून आणू,असा शब्द मंडलाध्यक्षांनी त्यांना या तयारीच्या आढावा बैठकीत दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नऊ आकड्याचा असाही योगायोग

भामच्याच बैठकीत शिरुरची जागा, जर भाजपला सुटली, तर तेथून लढण्याची तयारी महेशदादांनी पुन्हा दाखवली. नऊ हा आपला लकी नंबर असून शिरुरच्या क्रमाकांची (३६) बेरीज नऊ होते. त्यासोबतच भोसरी या माझ्या विधानसभा मतदारसंघाची (२०७) सुद्धा ती तेवढीच होते. एवढेच नाही,तर माझी जन्मतारीखही २७ असून तिची बेरीजही नऊच येते, असे महेश लांडगे यावेळी म्हणाले. त्यातून त्यांची शिरुर लढण्याची तयारी असल्याचे दिसून आले.

यापूर्वीही त्यांनी खेड येथील पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांनी ती पहिल्यांदा दर्शवली होती. त्यामुळे आता शिरुरकरांना प्रतीक्षा आहे ती महायुतीत कोणाला ही जागा मिळते आणि तेथे कोण दादा उमेदवार उभा राहणार याची.

SCROLL FOR NEXT