Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Kolhe Vs Adhalarao: हिंमत असेल तर या; कोल्हेंचे आढळरावांना खुलं चॅलेंज

Sudesh Mitkar

Pune Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार पुढे सरकत असताना प्रचारामध्ये आरोप- प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. उमेदवारांकडून आता वैयक्तिक टीका होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर आढळरावांनी चर्चेला यावं, असं खुले चॅलेंज कोल्हे यांनी दिले आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली होती.

"ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला. त्यावरून हे गद्दार आहेत हे माहिती होत हे इतके भेकड आहेत हे माहीत नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या," असं थेट जाहीर आव्हान कोल्हेंनी विरोधकांना दिले.

कोविड काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांचं खरंच हसू येतं, असं सांगत डॉ. कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकेच नव्हे तर फॅबी फ्ल्यू या 105 रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता.

तुमचं तोंड का शिवलं होतं

डॉ. कोल्हे यांच्या पदयात्रे दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याच उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं, जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं? बिबटप्रवण क्षेत्रात थ्री फ्रेज लाइट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवलं होतं?

समोरचा उमेदवारच डमी उमेदवार

माध्यमांमध्ये बातमी वाचली, समोरचा उमेदवार हा डॅमी उमेदवार आहे. मला फार खंत वाटली असं सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांकडून निधी आणला, म्हणून जे टिमकी वाजवत होते, त्या मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं, अशी बातमी माध्यमांनी दाखवली. मला वाटलं होतं समोरचा उमेदवार हा चॉईसने आलेला उमेदवार असेल, पण हा आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार आहे, अशी बातमी समोर आली.

मी वैयक्तिक टीकेवर गेलो नाही...

तेव्हा की ठरवलं होतं याविषयी बोलायचं नाही, पण राजकीय सुसंस्कृतपण अपेक्षित असताना, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असं ठरवलं होतं. आणि अजूनही ते कसोशीने जपलं आहे. पण अशा पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय होत नाही. पुरावे माझ्याकडेही आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT