Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024: कार्यकर्त्यांसमोर कोल्हेंनी व्यक्त केली भीती; म्हणाले, ऐनवेळी बूथ...

सरकारनामा ब्यूरो

Shirur Lok Sabha Election 2024: यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) ही फक्त आपल्या शिरूर मतदारसंघापुरती (Shirur Constituency) मर्यादित नाही, तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निर्णायाक अशी निवडणूक आहे. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत होणार आहे. तसंच लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक आहे.

त्यामुळे प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विरोधकांकडून ऐनवेळी बूथ काबीज करण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, असं आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कार्यकर्त्यांना केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अवसरीमध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलते होते. या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले, आपल्याला प्रत्येक बूथ महत्त्वाचा आहे. प्रत्येक बूथवर मताधिक्य मिळणे गरजेचे आहे. सर्व बूथवरील लीड मिळून आपलं लीड ठरणार आहे. आपल्याकडे मोठे नेते नाहीत. पैश्यांची खूप मोठी ताकद नाही, पण आपल्याकडे जनतेची ताकद आहे.

काही लोकांनी काहीही करून ही निवडणूक जिंकायची असं ठरवलं आहे. त्यामुळे ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. ऐनवेळी बूथ काबीज केला जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच ऐनवेळी बूथवरती गैरप्रकार होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी डोळ्यात तेल घालून जागरूक राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना या वेळी केलं.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT