Ajit Pawar News: EVMचे बटन दाबताना हात आखडता घेऊ नका; अन्यथा निधी देताना आम्हालाही...

Baramati lok Sabha Election 2024: "काही जण भावनिक मुद्दे आणतील, मात्र भावनिकतेने आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या खासदाराने आतापर्यंत कुठलं विकासकाम आणलं ते सांगा," असा टोला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News: बारामती लोकसभेची (Baramati lok Sabha Election 2024) जागा मिळविण्यासाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) सभांचा धडाका सुरू केला आहे. मेळावे, सभांमधून ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. इंदापुरात (Indapur Sabha) त्यांनी डॉक्टर, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. "तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, मात्र तुम्ही त्या प्रमाणात ईव्हीएमचे बटन पण दाबा. बटन दाबताना हात आखडता घेतला तर निधी देतानाही आम्हाला हात आखडता घ्यावा लागेल," असे अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत व्यापाऱ्यांना सांगितले.

देशामध्ये विकास करण्यासाठी पैसा लागतो. महाराष्ट्रातल्या टॅक्स माझ्या हातात आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तुम्ही पण पाळा. केंद्राचे बजेट झाल्याशिवाय राज्याचे बजेट करता येत नाही. यातून व्यापाऱ्यांना आणि सर्वांनाच फायदा होईल, मात्र फायदा कोणामुळे झाला हे विसरू नका. मला आदेश द्यायला आवडतो, मी अधिकाऱ्यांनाही आदेश देतो, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनाही आदेश देतो. आता मात्र हा कार्यकर्ता आहे याला सांभाळा, असे सांगावे लागते, असे ते मिश्लिकपणे म्हणाले.

"आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही आमचा पक्ष सोडला नाही, आम्ही शिवसेनेबरोबरदेखील गेलो होतो, मात्र त्यावेळी कोणी बोललं नाही, आता आम्ही भाजपबरोबर गेलो असे बोलतात. निवडणूक झाल्यानंतर विकासासाठी सर्व एकत्र येत असतात. एकीकडे मोदीसाहेब आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. दोघांची तुलना केल्यानंतर कामाचा माणूस कोण आहे, हे तुम्हाला समजेल," असे अजित पवार म्हणाले. "काही जण भावनिक मुद्दे आणतील, मात्र भावनिकतेने आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या खासदाराने आतापर्यंत कुठलं विकासकाम आणलं ते सांगा," असा टोला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला.

Ajit Pawar News
Shirdi Lok Sabha 2024: शिर्डीत ठाकरे-शिंदे शिलेदारांच्या बंद दाराआड जोरबैठका सुरू

अजित पवार यांनी इंदापुरात डॉक्टरांच्या मेळाव्याला संबोधित केलं. डॉक्टरांच्या प्रश्नांवर चर्चा करीत त्यांनी राजकीय वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावर निशाणा साधला. 'डॉक्टरांना पेशंटचे नातेवाईक मारहाण करतात हा मुद्दा गेले काही दिवसांपासून चर्चेत आहे. वास्तव पाहता डॉक्टर सर्वच रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु उपचारादरम्यान रुग्ण दगावला तर भावनेच्या भरात डॉक्टरांना मारहाण होते. दवाखान्याचे नुकसान करण्यात येते, परंतु रुग्णांच्या नातेवाइकांनीदेखील डॉक्टरांची भूमिका समजून घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले.

R

Ajit Pawar News
Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखे थोरातांना का म्हणाले मौनीबाबा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com