Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe sarkarnama
पुणे

Shirur Loksabha : 'मी डमी नाही डॅडी उमेदवार', शिवाजी आढळराव पाटलांचा कोल्हेंवर पलटवार

Roshan More

Loksabha Election : शिरुर लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार होती, असा दावा डाॅ. अमोल कोल्हे यांनी केला होता. या दाव्यासोबतच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. मी त्यांच्यावर फार काही बोलणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. कोल्ह्यांच्या टोल्याला शिवाजी आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमोल कोल्हे Amol Kolhe यांना प्रत्युत्तर देताना 'मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे.', असं म्हणत आढळरावांनी पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते. त्यामुळे आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. अशी खिल्ली कोल्हेंनी उडवली होती. त्यावेळी अशी विधाने करण्यात कोल्हे अन् संजय राऊतांमध्ये Sanjay Raut साम्य आहे. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेची टर उडवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आढळरावांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते याच मुद्दा पकडून अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोल लगावला होता. 'आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही.', असे कोल्हे म्हणाले होते.

कोल्हेंनी छगन भुजबळ यांना शिरुरमधून उमेदवारी देण्यात येणार होती, या दाव्यावर छगन भुजबळ यांनी सांगितले होते की त्यांची नाशिकमधून उमेदवारी फिक्स झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिरुरमधून लढणार का, अशी विचारणा केली होती. त्याबदल्यात त्यांना नाशिक हवे होते, असे देखील भुजबळ म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT