Sanjay Raut News: "आमचा सामना चोरलेल्या शिवसेनेबरोबर", राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Sanjay Raut On BJP: "वर्ध्यात (Wardha) भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ईव्हीएम मशीन (EVM Machine) बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं, त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो."
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath ShindeSarkarnama

Lok Sabha Election 2024 Phase 2: महाराष्ट्रातल्या आठ जागांवर आज मतदान होत असून, आठही जागांसाठी महाविकास आघाडीने धुवांधार प्रचार केला आहे. यापैकी तीन जागांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमचा सामना चोरलेल्या शिवसेनेबरोबर होणार आहे. त्यामुळे या सर्व जागा आम्ही जिंकणार असा विश्वास व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत, 35 प्लस हा आमचा टार्गेट आकडा असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.

तसेच, वर्ध्यात (Wardha) भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ईव्हीएम मशीन (EVM Machine) बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं, त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो. शिवाय या मशीन संध्याकाळनंतर चालू होतात आणि तिथे काही झुंडी उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे (BJP) षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर (Shiv Sena Manifesto) टीका केली जात आहे. यावर राऊत म्हणाले, लोक ठरवतील त्यात यू टर्नचा काय विषय आहे. बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतलेल्या आहेत. त्याला विरोध आहे का? मोदींनी जे गेल्या दहा वर्षांत यू टर्न घेतलेत त्यांचा वचननामा म्हणजे 'फेकनामा' आहे. आम्ही प्रथमच आमचा 'वचननामा' तीन पक्ष एकत्र आल्यावर जाहीर केल्याची पोटदुखी यांना सहन होत नाही, असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 Phase 2: दुसऱ्या टप्प्यातील लढती आठ, कुणाची पडणार कुणाशी गाठ?

पंतप्रधानांना जाब विचारायची हिंमत आहे का?

निवडणूक आयोगात (Election Commission) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) जाब विचारायची हिंमत आहे का? 'जर ही ताकद असती तर कर्नाटकात 'जय बजरंग बली'चा नारा देऊन मतदानाचे बटन दाबा' हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कार्यवाही झाली असती. काल काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टींचा उल्लेख नाही त्याबाबतच्या वक्तव्यावर, खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावरती कार्यवाहीची मागणी केली. खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं, अमित शाह रामलल्लाचं दर्शन मोफत करू हे सांगताना हा आयोग कुठे होता? जय भवानी जय शिवाजी यावर आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे, असं म्हणत राऊतांनी आयोगावर सडकून टीका केली.

(Edited By Jagdish Patil)

R

Sanjay Raut, Eknath Shinde
Vishal Patil: कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा..., विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com