ShivajiRao AdhalRao Patil join NCP  Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Election: अखेर ठरलं! शिंदेंचा शिलेदार 'या' तारखेला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Shirur Lok Sabha Election 2024: शिंदे गटाचे शिरूरमधील महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सरकारनामा ब्युरो

ShivajiRao AdhalRao Patil join NCP : मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे शिरूरमधील महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Ajit Pawar) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao AdhalRao Patil) यांचा 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आमचे राष्ट्रीय नेते नामदार अजित पवारांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची आणि सहकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या 26 तारखेला राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्याचं निश्चित झालं आहे. आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे आता शिरूरमधून अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Shivajirao Adharao Patil) अशी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार

आमच्या महायुतीने आणि घटक पक्षांनी 45 प्लसचा निर्धार केला असून, नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. तसेच आढळरावांच्या पक्षप्रवेशामुळे शिरूरसह पुण्यातील पक्षाची ताकद वाढणार असल्याचंही तटकरे या वेळी म्हणाले.

शिरूरमध्ये (Shirur) आढळराव पाटील हे शिंदे (Eknath Shinde) गटाकडून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा विद्यमान खासदार म्हणून अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आढळरावांची अडचण झाली. त्यामुळे ते पवार गटात प्रवेश करून त्यांच्याकडून ही लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. परंतु, त्यांच्या नावाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांसह (Dilip Mohite Patil) इतर पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे खुद्द अजित पवारांनी पुढाकार घेऊन दिलीप मोहिते पाटील यांची समजूत काढली. तसेच इतर विधानसभा मतदारसंघातही बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर अजित पवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं मोहिते पाटील यांनी जाहीर केलं. याच पार्श्वभूमीवर आता आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं फायनल झालं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT