Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या निर्णयावर पक्षाचीही मोहोर; शिरूरला पुन्हा एकदा कोल्हेच उमेदवार

Shirur Political News : शिवाजीराव आढळराव पाटील घड्याळ्यावर लढण्याची चिन्हे...
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवारांनी तयारीला लागण्याचे आदेश दिलेले शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हेच पुन्हा तेथे त्यांच्या पक्षाचे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तथा आघाडीचे उमेदवार असणार हे शुक्रवारी (ता.२२) नक्की झाले. त्यामुळे आता ते विजयाची पुनरावृत्ती करणार की गतवेळी खासदारकीचा चौकार चुकविलेले शिवाजीराव आढळराव-पाटील हे त्या पराभवाचा यावेळी बदला घेणार, हे येत्या जूनमध्ये कळणार आहे. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Ncp Sharad Pawar News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित; 'या' उमेदवारांची नावे फायनल?

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर कोल्हे यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला, तेथेच त्यांची पुन्हा उमेदवारी निश्चित झाली होती. नंतर खुद्द पवारांनीच त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर ते मतदारसंघात अधिक सक्रिय झाले. त्यातून त्यांची उमेदवारी जणूकाही नक्कीच झाली. आज त्यांच्या पक्षाने फायनल केलेल्या नऊजणांत त्यांचे नाव आल्याने त्यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.आता फक्त अधिकृत घोषणाच काय ती होणे बाकी आहे, ती केव्हाही होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हेंसारखीच परिस्थिती त्यांचे शिरुरमधील संभाव्य प्रतिस्पर्धी महायुतीचे आढळराव यांचीही आहे. त्यांचेही नाव नक्की झाले असून फक्त अधिकृत घोषणा राहिली आहे. ते शिवसेनेचे उपनेते असून राष्ट्रवादीकडून लढणार आहे.म्हणून त्यांच्या नावाच्या निश्चितीपासून आणि ते जाहीर होण्यासाठी वेळ लागला आहे. पण, ते सुद्धा कोल्हेंसारखे कुठल्याही क्षणी आता जाहीर होऊ शकते. हेच दोघे गतवेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी आढळरावांचा खासदारकीचा चौकार कोल्हेंनी चुकविल्याने तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून त्यांनी पुन्हा जिंकण्याची तयारी सुरु केली होती. त्या इर्षेतूनच ते राष्ट्रवादीकडूनही लढण्यास यावेळी तयार झाले आहेत.

शरद पवार यांना शिरुरची जागा टिकवायची असून अजित पवार यांना ती त्यांच्याकडून खेचून आणायची आहे. त्यामुळे ती या दोघांनीही आपल्या मोठ्या प्रतिष्ठेची केली आहे. त्य़ासाठी आपली सर्व ताकद आणि कसब तेथे पणाला लावले आहे. शरद पवारांनी कोल्हेंसाठी अगोदरच सभा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकलेले आहे.

Lok Sabha Election 2024
BJP News: "शरद पवार आणि राहुल गांधींच्या नादाला लागून..." राऊतांच्या मोदींवरील टीकेला भाजपचं सडेतोड प्रत्युत्तर

मात्र आढळरावांच्या उमेदवारीला पक्षातूनच असलेला विरोध शमवण्यासाठी वेळ लागल्याने अजित पवारांना आढळरावांचा थेट आणि जाहीर प्रचार अद्याप सुरु करता आलेला नाही. त्यांनी कोल्हेंचा पराभव करण्याचे चॅलेंज दिले आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेकडे असलेली ही जागा यावेळी आपल्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडे (NCP) घेतली आहे. जागाच नाही, तर तेथील उमेदवारही (आढळराव) शिवसेनेकडूनच त्यांनी आयात केला आहे.

शिरुर आणि कोल्हेंप्रमाणे राष्ट्रवादीने बारामतीत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पुन्हा संधी दिली आहे.त्यांचे नाव नक्की आज केलेल्या नऊजणांत आहे. नगर दक्षिणमधून कोल्हेंसारखीच साथ दिलेल्या आमदार निलेश लंके हे शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. माढ्यातून रासपचे महादेव जानकर, तर वर्धा येथे अमर काळे यांचे नाव नक्की झाले आहे. ही 5 नावे नक्की झालेल्या मतदारसंघासह रावेर, सातारा, शिरुर, दिंडोरी, बीड अशा नऊ जागा लढण्याचे आतापर्यंत राष्ट्रवादीने नक्की केले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com