Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

Shirur News : ठाकरेंना पुन्हा धक्का; दिवंगत आमदार गोरे कुटुंबियांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांचे कुटुंबिय व स्थानिक स्तरावरील अनेक जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे सदस्य यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश काल रात्री (दि. १४ मार्च) पार पडला.

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचा कोव्हिड काळात निधन झाले होते. गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश गोरे, त्यांचे बंधू नितीन गुलाब गोरे हे सद्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड सदस्यपदी कार्यरत आहेत. यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गोरे कुटुंबासह आणखी काही स्थानिक नेत्यांचा शिंदे च्या शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य रुपाली श्रीकांत कड, ऍड विजयसिंह बाबासाहेब शिंदे, सभापती दत्ताशेठ भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य मचिंद्र गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती काळूरामशेठ कड, खेड तालुका अध्यक्ष बिपिनशेठ रासकर, चाकण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगलताई गोरे, स्नेहलताई जगताप चाकण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय गोरे, ऍड प्रकाश लक्ष्मण गोरे, ऋषिकेश झगडे, नगरसेवक निलेश बबन गोरे, प्रविण शांताराम गोरे, सुजाताताई मंडलिक, महेश मोरेश्वर शेवकरी, नयनाताई झनकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष माऊली चिमाजी सातकर, भगवान पोखरकर, राजू जवळेकर अशोक भुजबळ इत्यादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मनीषा सुरेश गोरे तसेच नितीन गोरे यांचे शिवसेना मध्ये स्वागत करतो. नितीन आणि मनीषा ताई आणि त्यांचा परिवार आज बाळासाहेब यांच्या विचारांच्या शिवसेनेतमध्ये दाखल होत आहेत. खेड आळंदी चाकण मध्ये रॅली काढली आणि आज हा मोठा प्रोग्रेम झाला. एक मोठी ताकद चाकण मध्ये पाहायला मिळणार आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना अनेक लोक सोबत येत आहेत. म्हणून हे आपल्या सर्वांचे सरकार आहे."

"गेल्या सात आठ महिन्यात जे निर्णय घेतले ते सर्वांच्या हिताचे आहेत. त्याच प्रमाणे आपण सादर केलेला बजेट देखील सर्वसमावेशक आहे.आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. अनेक प्रकल्प पुढे नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.गोरे हे कमी बोलणारे पण काम करणारा माणूस आहे, " असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT