Shirur News : Shivajirao Adhalrao Patil :  Sarakarnnama
पुणे

Shirur News : 'शिरूरमध्ये महाविकास आघाडी एकत्रित आली तरी...' ; आढळराव पाटील स्पष्टच बोलले!

Shivajirao Adhalrao Patil : शिरूरची परिस्थिती बदलेली आहे..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेत दाखल झाल्यानंतर खासदारकीसाठी ते पुन्हा इच्छुक आहेत, अशी चर्चा होती. 'सरकारनामा'ने आढळराव पाटील यांची विशेष मुलाखत घेतली.

मुलाखतीत आढळराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, "आगामी लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवली तर एका सर्व्हेनुसार ४८ पैकी ४० जागा महाविकास आघाडी जिंकेल. अशा परिस्थितीत शिरूरमध्ये तुम्ही भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राहिलात, तर खरोखर तुमचा टिकाव लागू शकेल का? "

यावर उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, "मला पूर्ण खात्री आहे की, कुठल्याही परिस्थितीत मी लढलो किंवा शिवसेना - भाजप युतीचा कोणीही उमेदवार शिरूरमधून लढला, तर शंभर टक्के निवडून येण्याची पूर्ण खात्री आहे. मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की, निवडून येण्याची मला पूर्ण खात्री आहे," असा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केला.

"आता तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलात. भाजपने ही शिरूरवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत तुमची अडचण होईल, असे वाटत नाही का? भाजपने शिरूरवर दावा केला तर तुम्ही काय करणार?" असा ही प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, "भाजपने शिरूरवर दावा केला, असा ठोस पुरावा नाही. चर्चा, अफवा या गोष्टी चालतच राहतात. ज्यावेळी आम्ही १३ खासदार शिंदेकडे गेले. त्या प्रक्रियेत मी सोबतच होतो. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या त्या जागा शिवसेनेलाच मिळणार, त्या शिवसेनाच लढणार, हे ठरलं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT