Shirur News : भाजपने शिरूर लोकसभेवर दावा सांगितला तर तुम्ही काय करणार? ; आढळराव पाटील म्हणाले..

Shivajirao Adhalrao Patil : "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मला कुठे शब्द होता?"
Shivajirao Adhalrao Patil : Shirur News
Shivajirao Adhalrao Patil : Shirur NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेत दाखल झाल्यानंतर खासदारकीसाठी ते पुन्हा इच्छुक आहेत, अशी चर्चा होती. मात्र शिरूरवर भाजपनेही दावा सांगितल्याची चर्चा होती. 'सरकारनामा'ने आढळराव पाटील यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शिरूरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Shivajirao Adhalrao Patil : Shirur News
OBC : राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे ओबीसी नेत्यांनी केले स्वागत !

'सरकारनामा'ने आढळराव यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, "आता तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलात. भाजपने ही शिरूरवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत तुमची अडचण होईल, असे वाटत नाही का? भाजपने शिरूरवर दावा केला तर तुम्ही काय करणार?" असा प्रश्न आढळरावांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना आढळराव म्हणाले, "भाजपने शिरूरवर दावा केला, असा ठोस पुरावा नाही. चर्चा, अफवा या गोष्टी चालतच राहतात. ज्यावेळी आम्ही १३ खासदार शिंदेकडे गेले. त्या प्रक्रियेत मी सोबतच होतो. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या त्या जागा शिवसेनेलाच मिळणार, त्या शिवसेनाच लढणार, हे ठरलं आहे."

Shivajirao Adhalrao Patil : Shirur News
Girish Mahajan News : दोन दिवसांत पंचनामे, अहवाल येताच भरीव मदतीची ग्वाही..

पुढे आढळराव म्हणाले, 'मी शिंदेकडून कुठलाही शब्द घेतला नाही. कोणतीही अट ठेवली नाही. माझ्या दृष्टीने खासदार होणं एवढं महत्त्वाचं नाही. आज चार वर्षे झाले, खासदार नाही. तरी खासदारांपेक्षा जास्त कामे करतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतसुद्धा मला कुठे शब्द होता? मीच म्हणत होतो, कशाला राष्ट्रवादीबरोबर संघर्ष करताय," असे आढळराव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com