Pune BJP Politics News Sarkarnama
पुणे

Pune Politics : पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार? तब्बल 21 माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार!

BJP VS Shiv Sena Congress NCP : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्षांना खिंडार पाडले आहे. तब्बल माजी 21 नगरसेवक भाजजपच्या वाटेवर आहेत.

Roshan More

Pune BJP : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. या विरोधी पक्षातील तब्बल 21 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातील 11 जणांच्या प्रवेशासाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या संदर्भात साम टिव्हीने सुत्रांच्या हवालने वृत्त दिले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेतील माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या विरोधातील पक्ष कमजोर होत असल्याची चर्चा आहे.

भाजपने पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फूटीमुळे पक्षाची ताकद शहरात अत्यंत कमी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देखील तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेत महायुतीमधीलच मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपची थेट टक्कर होईल, अशी शक्यता आहे.

2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 नगरसेवक विजयी झाले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बहुतांश नगरसेवक अजित पवारांच्यासोबत कायम राहिले होते. अनेक माजी नगरसेवक भाजपसोबत युती करून आता लढले पाहिजे या विचाराचे आहेत. मात्र, भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने त्यांची कोंडी झाली आहे.

लवकरच पक्ष प्रवेश...

माजी नगरसेवक दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपमध्ये येणार होते. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी इन्कमिंगला विरोध केल्याने हा पक्षप्रवेश रखडला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात होते. मात्र, तो देखील हुकला. त्यामुळे पालिका निवडणूक घोषित होण्याच्या आधी 21 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT