Nitin Banugade Patil
Nitin Banugade Patil  Sarkarnama
पुणे

महाराष्ट्राच्या नादाला लागतो; त्याचा औरंगजेब होतो : शिवसेना उपनेते बानुगडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : औरंगजेबाने जंगजंग पछाडले होते. पण, त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र (Maharashtra) काबीज करता आला नाही, हा इतिहास आहे. हिंदूहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारातून प्रेरित झालेले शिवसैनिक गेली ५६ वर्षे महाराष्ट्राची अस्मिता व रक्षणासाठी नेटाने काम करत आहेत. कोणी कितीही मनसुबे करा, त्यात त्यांना यश येणार नाही. महाराष्ट्राच्या नादाला लागतो, त्याचा औरंगजेब होतो, अशी टीका विरोधकांचे नाव न घेता शिवसेनेचे (Shivsena) उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील (Nitin Banugade Patil) यांनी केली. (Shiv Sena deputy leader Nitin Banugade Patil criticized the opposition)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षातर्फे बुधवारी (ता. १६ नोव्हेंंबर) आयोजित (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृर्तीदिन कार्यक्रमात प्रा. बानगुडे पाटील बोलत होते.

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. ते शरीराने आपल्या बरोबर आज नाहीत पण मनाने व विचाराने सदैव आपल्याबरोबर आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्येकाने मोलाची साथ द्यावी. महाराष्ट्रावर भगवाच फडकेल, असा विश्वास प्रा. बानुगडे पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शरद चौधरी, दिलीप बाम्हणे, माऊली खंडागळे, दिलीप पवळे, प्रज्ञा भोर, बाबू पाटे, संगीता बाणखेले, मंगल राऊत, गोविंद काळे, कार्यक्रमाचे आयोजक व लोकमान्य प्रतिष्ठानचे संस्थापक दत्ता गांजाळे, सुजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व (स्व) बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भोर, माऊली कटके, संदीप वाबळे यांची भाषणे झाली. शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्याहस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना औषध वाटप करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT