Sachin Ahir News Sarkarnama
पुणे

Sachin Ahir News : 'उद्धव ठाकरेंना खाली खेचण्याचे काम करणाऱ्यांना जागा दाखवणारच!'

Sachin Ahir News : शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची शिंदे गटावर जोरदार टीका

सरकारनामा ब्यूरो

नारायणगाव : राज्याच्या सत्तेत सहभागी असताना महाविकास आघाडीवर जे टीका करत होते. त्यांनीच खुर्चीच्या हेतूने षडयंत्र रचले. राज्याच्या इतिहासामध्ये गद्दारांची व निष्ठावान यांची नोंद घेतली जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खाली खेचण्याचे ज्यांनी काम केले. त्यांना जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. असा इशारा पुणे जिल्ह्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी दिला. (Sachin Ahir News)

येथील जयहिंद मंगल कार्यालय मध्ये शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार बाळासाहेब दांगट होते. या वेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम, विजया शिंदे, शरद चौधरी, तालुका संघटक, सरपंच योगेश पाटे, मोहन बांगर, अजित सहाने, सुनील ढवळे, प्रसन्ना डोके, जीवन शिंदे, उपसरपंच आरिफ आतार आदी उपस्थित होते.

अहिर म्हणाले राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. उद्योग राज्या बाहेर जात असताना राज्याचे मंत्रिमंडळ गणपती बाप्पा, नवरात्र उत्सव, कामया देवीचे दर्शन, भविष्य वाणी यामध्ये तल्लीन आहे. राज्य सरकारचा कारभार दिशाहीन आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्यपाल, आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अवमान सहन करणार नाही, असे सांगत असताना अवमान करणारावर कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. सत्तेसाठी महाराजांचे नाव घ्यायचे. सत्ता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायचा. अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे.

अहिर पुढे म्हणाले, महाराष्ट्र सीमा प्रश्न जटिल होत चालला आहे. महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली जात आहे. हा प्रश्न सोडवण्याची राज्य शासनाची ही नैतिक जबाबदारी आहे. गद्दारी केलेले अपघाताने निवडून आलेले पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरत आहेत. षडयंत्राचा एक भाग या भागातील माजी खासदार व माजी आमदार होते ती काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जनतेची सहानुभूती मिळत आहे, असल्याचेही आहिर म्हणाले.

सर्व जाती-धर्माचे लोक पक्षात प्रवेश करत आहेत. पक्षातून दहा गेले तरी शंभर येत आहेत. पराभवाची भीती असल्याने जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली जात आहे. जुन्नर तालुक्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची असेल, तर जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवा. असे आवाहन या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख अहिर यांनी केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. असे आवाहन या वेळी माजी आमदार दांगट, तालुका प्रमुख खंडागळे, संघटक पाटे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT