Supriya Sule on Navale Bridge: पुण्यातल्या नवले पुलाचा प्रश्न संसदेत; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule : पण अजूनही शून्य अपघातांच्या लक्ष्य पूर्ण झाले नाही.
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. संसदेत पहिल्याच दिवशी पुणे शहराला भेडसवणारा एक ज्वलंत प्रश्न उपस्थित झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील नवले पूल येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांचा प्रश्न संसदेत मांडला आहे. यावर ठोस पावलं उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या आपल्या देशात रस्तासुरक्षा हे एक एक मोठं आव्हान आहे, मी या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते. माझ्या मतदारसंघातल्या पुणे शहरातील खडकवासला भागात, नऱ्हे या ठिकाणी नवले पूलाजवळ अपघातांची मालिकाच सुरू आहे. साल २०२१ या एकाच वर्षी १७ जणांना वाहन अपघातात जीव गमवावे लागले, आणि २४ लोक गंभीर जखमी झाले. मागील महिन्यात २१ नोव्हेंबरला या ठिकाणी ट्रक वाहनावरील नियंत्रण सुटत असल्याने झालेल्या अपघातात, ४० वाहनांचे नुकसान झाले.

Supriya Sule
Supriya Sule : लोकसभेतील सीमावादाच्या खडाजंगीत सुप्रिया सुळेंना मिळाली शिंदे गटाच्या खासदारांची साथ

नवले पूल हे अपघातासाठी कुप्रसिद्ध ठिकाण झाले आहे. याठिकाणच्या चढउतार आणि धोकादायक वळणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मी पुन्हा पुन्हा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आणते आहे. आणि या ठिकाणीचा रस्ता दुरूस्त करण्याची गरज आहे. पोलिस आणि प्रशासनाने लोकांकडून या ठिकाणी वाहतुकीचे नियम पूर्तता करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी म्हंटले.

Supriya Sule
Sachin Ahir News: ज्यांना पोल्ट्री उभी करता आली नाही, त्यांनी पतसंस्थांची बदनामी थांबवावी...

मागील काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस प्रशासन आणि पुणे मनपाने या ठिकाणी अनेक पावलं उचलली, पण अजूनही शून्य अपघातांच्या लक्ष्य पूर्ण झाले नाही. मी केंद्रिय रस्ते महामार्ग मंत्रालयालाविनंती करते की, त्यांनी या बाबत काही ठोस पावलं उचलावीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com