Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

Neelam Gorhe : राज-उद्धव एकत्र येतील का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'वारसा तर शिंदेंकडे...'

Maharashtra Legislative Council Deputy Chairperson Neelam Gorhe Thackeray brothers Rajgurunagar Pune : शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्यावर पुणे राजगुरूनगर इथं प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics news : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे राज ठाकरे यांनी युतीसाठी एकमेकांना मनोमीलनाची टाळी दिल्याने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहे.

शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावर प्रतिक्रिया विचारल्यावर ते संतापलेले दिसले. यानंतर त्यांच्या पक्षातील मंत्री, आमदार, खासदार आणि नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेत बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप महायुतीबरोबर सुरूवातीला मुख्यमंत्री, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. शिवसेना बरोबर घेऊन, राज्य कारभार करत असतानाच, राज-उद्धव ठाकरे मनोमीलनाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. भाजपसह इतर पक्षांनी त्यावर सावध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

भाजपबरोबर (BJP) महायुतीत मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज-उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनावर टीका करत आहेत. एकनाथ शिंदे यांना विचारल्यावर ते संतापलेले दिसले. यानंतर मात्र शिवसेनेतील नेत्यांनी अधिकच सावध प्रतिक्रिया देण्यास सुरुवाती केली. आता शिवसेना नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना देखील अतिशय सावधपणा बाळगला.

नीमल गोऱ्हे म्हणाल्या, "यावर मला बरंच काही वाटतं, पण बोलणं योग्य नाही. मी व्यक्त करणं योग्य वाटत नाही. बाकी नेत्यांनी आपला मार्ग स्वतः ठरवावा". बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा एकनाथ शिंदे घेऊन चालले आहेत. त्यामुळे इतरांनी त्यांच्यामुळे घाबरून जाऊ नये, या विषयावर काहीच दिवसात चित्र स्पष्ट होईल, असेही गोऱ्हे म्हटल्या.

ठाकरे बंधू एकत्र येणार नाही : मंत्री शिरसाट

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपले मत नोंदविले आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. मात्र तसं होणार नाही. ठाकरे बंधूंना चांडाळ चौकडी एकत्र येऊ देणार नाही, असा टोला मंत्री शिरसाट यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT