Sharad Sonawane, Udhav Thackeray
Sharad Sonawane, Udhav Thackeray sarkarnama
पुणे

शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी ; बाहेरच्यांना गुलाबजाम अन् आम्हाला डाळभात पण नाही !

रोहिदास गाडगे

पुणे : राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shiv Sena) समर्थनार्थ मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यात शिवसेना शक्तीप्रदर्शन करीत आहे. चाकण येथे झालेल्या मेळाव्यात नेत्यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. (Sharad Sonawane latest news)

आपल्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर टीका करीत पक्षश्रेष्ठींनाही खडेबोल सुनावले. यावेळी आमदार सचिन आहिर उपस्थित होते.

"शिवसेनेला नुसतं समर्थन देऊन चालणार नाही तर, आमच्या मनातल्या अडचणींही आता त्यांना ऐकाव्या लागतील. गेल्या तीन वर्षात शिवसैनिकांची पाठराखण झाली नाही. त्यामुळे शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे," अशी खंत शरद सोनवणेंनी व्यक्त केली.

आमचं म्हणणं सांगाल ना साहेब..

"आम्ही तुमचे आहोत, कुठही जाणार नाही, मात्र बाहेरच्यांना गुलाबजामून आणि आम्हाला डाळभात पण नाही, हे आता थांबवायला पाहिजे. 'मातोश्री'चे दरवाजे पदाधिकाऱ्यांसाठी उघडे केले तर हाच पदाधिकारी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही," अशा शब्दात सोनवणे यांनी आपली व्यथा मांडली. "आमचे म्हणणं सांगाल ना साहेब.." असे म्हणत आमदार सचिन आहिर यांच्यासमोर सोनवणेंनी हात जोडले.

राष्ट्रवादीसमोर आम्हाला लढावं लागतं

"आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे आहोत आणि राहणार, आम्हाला शिवसेनेचा त्रास नाही, पण राष्ट्रवादीसमोर आम्हाला लढावं लागतं, या आमच्या भावना 'मातोश्री'नी ऐकाव्यात," अशी विनंती सोनवणे यांनी सचिन आहिरांकडे केली."सरकार आमचं आहे म्हणून आम्हाला अभिमान वाटतो,पण शिवसेनेच्या उमेदवारांना ज्यांनी निवडणुकीत विजयी केलं,त्या जनतेची कामे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी केलीच पाहिजे," असे सोनवणे यांनी आहिरांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या आमदारांचा खटाटोप

खेड पंचायत समिती इमारतीच्या कामाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार खटाटोप करतात, त्यामुळे शिवसेनेची अधोगती झाली, असा गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT