Shivsena UBT Pune : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा फुटला असून पक्षातील सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. यामुळं राज्यभर खळबळ उडाली असतानाच दुसरीकडं पुण्यात देखील पक्षाला खिंडर पडलं असून पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
खासदार फुटीनंतर राज्यभरामध्ये ठाकरे सेनेला आणखीन काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच पहिला धक्का हा पुण्यातून बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. युवासेना आणि शिवसेनेत तब्बल ११ वर्षे सक्रिय असलेले उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिवाजी तुपे यांनी आज मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश जाहीर केला.
गेल्या ११ वर्षांपासून युवासेना आणि शिवसेनेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या तुपे यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. ओंकार तुपे यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात युवा मोर्चा ताकद वाढणार असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. तर ठाकरे गटासाठी हा आणखी एक राजकीय धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.