BJP Vs Shivsena : 700 कोटींच्या उलाढालीवर भाजप-शिवसेनेचा डोळा: मंत्री, आमदार अन् खासदारांनी लावली फिल्डिंग

Chhatrapati Sambhajinagar District Bank Election, Shiv Sena Entry, Congress vs BJP: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. सहकार क्षेत्रातील या प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Chhatrapati Sambhajinagar District Bank .jpg
Chhatrapati Sambhajinagar District Bank Sarkarnama
Published on
Updated on

Co-operative Election News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या ८ जुलै रोजी होत आहे. स्थापनेसूनच या बँकेवर राजकीय पुढार्‍यांचे वर्चस्व राहिले आहे. स्थापनेनंतर अनेक वर्षे ही बँक काँग्रेसच्या ताब्यात होती. रामकृष्ण बाबा पाटील, सुरेश पाटील यांनी जिल्हा बँकेत काँग्रेसची सत्ता राखली.

काँग्रेसच्या जिल्हा बँकेतील वर्चस्वाला गेल्या काही वर्षांपासून शिवसेना- भाजपने हादरा दिला. मात्र जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेसकडून राखण्यात आलेली घराणेशाहीची परंपरा नव्या सत्ताधाऱ्यांनीही पुढे सुरूच ठेवल्याचे चित्र सध्या सुरू असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते. 700 कोटींची उलाढाल आणि 23 कोटींचा निव्वळ नफा असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकराशे मतदार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar District Bank .jpg
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

जिल्ह्यात बँकेच्या 137 शाखा आणि 3137 कोटींच्या ठेवी असा मोठा कारभार आहे. मागील संचालक मंडळाच्या निवडणुकीत ही बँक शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने पहिल्यांदाच गैरकाँग्रेसी नेतृत्वाकडे गेली. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा डोळा आता सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आहे.

Chhatrapati Sambhajinagar District Bank .jpg
Aurangabad District Bank : विलास भुमरे- समीर सत्तार जिल्हा बँकेच्या मैदानात; बिनविरोधसाठी नेत्यांची तडजोडीचीही तयारी!

राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाला अध्यक्ष करण्यासाठी दबाव तंत्रात आणण्यात काहीसे यश मिळवले आहे. चार जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी नंतरच सत्तार यांचे दबाव तंत्र कामी आले का? की भाजपने महापालिका, जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हा बँकही शिवसेनेकडून ताब्यत घेतली? हे स्पष्ट होईल.

दरम्यान सहकार कायद्याच्या नव्या नियमांचा फटका बँकेच्या दहा ते अकरा माजी संचालकांना बसला आहे. त्यांना संचालक मंडळाची निवडणूक लढवता येणार नसल्याने या सर्व नेत्यांनी आपल्या वारसांना जिल्हा बँकेच्या राजकारणात घुसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्यांची नगरसेवक कन्या हर्षदा शिरसाट मैदानात उतरले आहेत.

भाजपचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, भाजपा आमदार अनुराधा चव्हाण आणि शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी पहिल्यांदाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. तर काही आजी-माजी संचालकांनी आपला मुलगा, मुलगी, भाऊ, पत्नी, सून यांची वर्णी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात लावण्याची तयारी केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar District Bank .jpg
MLC Election 2026 : महायुतीच्या सुहास शिरसाट यांचा मार्ग मोकळा, समीर सत्तार यांची निवडणुकीतून माघार!

यात प्रामुख्याने संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट, खासदार संदिपान भुमरे यांचे आमदार पुत्र विलास भुमरे, भाऊ राजू भुमरे तसेच काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे त्यांचे बंधु जगन्नाथ काळे, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार, माजी आमदार नितीन पाटील यांची पत्नी अर्चना पाटील, मुलगा अर्जुन पाटील यांचा समावेश आहे.

तसेच भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आमदार संजना जाधव, माजी आमदार नामदेव पवार यांचे सुपुत्र सुमित पवार, माजी आमदार दिवंगत शिवाजी काळे यांचे पुत्र रवींद्र काळे, माजी आमदार आण्णासाहेब माने यांच्या स्नुषा श्रद्धा माने, दिवंगत माजी खासदार साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या स्नुषा देवयानी डोणगावकर व पुत्र कृष्णा पाटील डोणगावकर हे देखील संचालक मंडळाच्या निवडणुकीत मैदानात उतरले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar District Bank .jpg
District Bank Election: जिल्हा बँकेत घराणेशाहीला ऊत! सत्तार, भुमरे, शिरसाट यांचे राजकीय वारस निवडणूक रिंगणात

एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची बँक असल्याचे सांगत सत्तेची सगळी सूत्र आपल्या हाती ठेवून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा जिल्ह्यातील नेत्यांचा प्रयत्न आहे. आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांनी जिल्हा बँकेत नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे.

प्रामुख्याने माजी नगरसेवक राजू शिंदे, पुनमचंद बमणे, संदीप बोरसे, राजू शेळके यांनीही संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. 214 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून छाननी नंतर कोणाचे अर्ज बाद होतात कोणाचे कायम राहतात? हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर माघारीच्या मुदतीत कोण आपले अर्ज कायम ठेवणार आणि कोण माघार घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. जिल्हा बँकेमध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेते मैदानात उतरल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com