Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तीन उमेदवार याद्या जाहीर करण्यात आल्या आहे. मात्र अद्याप शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पक्षातील इच्छुकांनी आयात उमेदवार नको अशी भूमिका घेतली आहे.
काल (शनिवारी) सायंकाळी पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक आले असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे जाऊन घोषणाबाजी करत आयात उमेदवार नको अशी मागणी केली. यामुळे काँग्रेस भवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज खुलासा केला आहे.
अरविंद शिंदे म्हणाले, काल पश्चिम महाराष्ट्रची बैठक काँग्रेस भवन येथे झाली. बैठकीला काँग्रेसचे निरीक्षक उपस्थित होते. त्यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवार घ्यावा आयात उमेदवार घेऊ नये, अशी मागणी केली. यावेळी कोणतीही बाचाबाची, धक्काबुक्की अथवा शिवीगाळ झाली नाही जे काही माध्यमांमध्ये आलं ते धांदात खोट आहे. धक्काबुक्की किंवा शिवीगाळ झाल्याचा सिद्ध झाल्यास मी राजकारणातुन संन्यास घ्यायला तयार आहे.
काल निरीक्षक पुण्यात असल्यामुळे त्यांना आपलं मत सांगण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आले होते.त्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षातील उमेदवारांना संधी द्यावी, आयात उमेदवार घेऊ नका, अशी घोषणाबाजी केली. मात्र कोणताही वाद या ठिकाणी झाला नाही.
शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारांबाबत राज्यातील आणि केंद्रातील काँग्रेसची कमिटी निर्णय घेणार आहे. आम्ही आमचं मत त्यांच्यापुढे मांडला आहे. आता वरिष्ठ पातळीवर काँग्रेस उमेदवारा बाबत निर्णय होईल. जो उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील त्याचं काम करून त्याला निवडून आणण्याचे काम काँग्रेसचे कार्यकर्ते करतील असे शिंदे म्हणाले.
निवडणूक जिंकण्याची निकष पाहूनच उमेदवार निश्चिती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवाराला आपण आयात करणार आहोत त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. त्याची पार्श्वभूमी काँग्रेसची आहे का? या सर्व बाबींचा विचार करूनच त्याला उमेदवारी निश्चित करण्यात येते. मात्र जे पूर्वी काँग्रेसचे होते आणि ते पक्ष सोडून गेले होते त्यांना परत पक्षामध्ये घेण्याची भूमिका घ्यावी लागेल जेणेकरून पक्ष वाढेल, असे शिंदे म्हणाले.
विविध मतदार संघामध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळालेले नाराज आहेत. सर्व नाराजांची नाराजी दूर करण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची बंडखोर पुण्यात दिसणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.