Kalyan Politics: आव्हाडांनी जाणून-बुजून ठाकरेंसाठी जागा सोडली; शरद पवारांचा शिलेदार अपक्ष लढणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Kalyan Politics: ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत येथून अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. चारही विधानसभेत ठाकरे गटाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांतील नाराजी पसरली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने अनेक वर्षे पक्षाचे काम करणारे परंतू कधी विधानसभा निवडणूक लढण्याची संधी न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांना पक्ष फुटीमुळे संधी चालून आली आहे. ही संधी हातून जाऊ न देण्यासाठी प्रत्येक इच्छुक पदाधिकारी जोर लावत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बेबनाव असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाल्याचे चित्र आहे. कल्याण डोंबिवली मधील चारही जागा या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाराज झाला आहे. ठाकरे सेनेला मदत न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत येथून अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. चारही विधानसभेत ठाकरे गटाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे.

उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षात प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडू घेण्यासाठी अनेकजण पक्षातील वरिष्ठांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये फारसे सख्य नाही. कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे एका प्रकरणात कारागृहात आहे. त्यामुळे ही जागा भाजपला न सोडता शिवसेनेला दिली जावी अशी मागणी शिंदे गटाकडून होत होती.

Jitendra Awhad
Uddhav Thackeray: शिवसैनिक हतबल; जिल्ह्यात एकाही जागेवर उमेदवार नाही !पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत

भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करत शिंदे गटाच्या इच्छेवर पाणी फेरले आहे. काहीसे चित्र महाविकास आघाडीत आहे. येथे ठाकरे गटाकडे या जागा सोडण्यात आल्याने पवार गटात नाराजीचे वातावरण आहे. पक्षातील वरिष्ठ जाणून बुजून हे करत असल्याने विधानसभा निवडणूकीत पक्षातील वरिष्ठांना मदत न करता अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सुधीर वंडार पाटील म्हणाले, "ठाणे जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. 1999 पासून येथे पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते याचा अर्थ येथे राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार हे ठाणे जिल्ह्यातून निवडून येत होते. कल्याण पूर्वेला राष्ट्रवादीचे आमदार होते. मोदींच्या लाटेत वेगळी गोष्ट होती. परंतु असे असताना सुद्धा वरिष्ठ जितेंद्र आव्हाड हे जाणून बुजून ठाकरे गटाला जागा सोडत आहेत. यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून यापुढे ठाणे जिल्ह्यातील युवक हे आव्हाड यांच्या विरोधात काम करतील,"

कल्याण पूर्वेची जागा राष्ट्रवादीला दिली जावी अशी आमची मागणी होती. त्यादृष्टीने सर्व कामाला देखील लागले होते. परंतू वरिष्ठांच्या या निर्णयामुळे आता आम्ही मदत न करण्याचा निर्णय एकमताने या बैठकीत घेतला आहे. अपक्ष म्हणून मी येथून निवडणूक लढवेल असे देखील सुधीर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com