Eknath Shinde News : मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'आता एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन', या शब्दांत खुले चॅलेंज दिले. भाजप नेत्यांकडून ठाकरेंना उत्तर देण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
'आता घरात बसणारे मैदानात उतरण्याची भाषा करत आहेत. फडणवीसांना संपवण्याची भाषा काही लोक करत आहेत. चांगल्या योजनांचा घाव त्यांच्या वर्मी लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी सगळा महाराष्ट्र आहे.', असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'सरकारच्या चांगल्या योजना पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. संपवण्याची भाषा कधी केली जाते. जेव्हा मानसिक गोंधळ असतो तेव्हा. आव्हान करताना आपण कुठे आहोत हे पाहावे. मनगटात जोर असावा लागतो', असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
'घरात बसून काही होत नाही. लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते. आम्ही फेसबूकवर काम करणारे लोक नाही. तर फेस टू फेस काम करणारे आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली एकनाथ शिंदे यांनी लगावला.
राजकारणात कोणी कोणाला राजकारणात संपवण्याची भाषा करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी जे काम केले आहे त्यामुळे सारा महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे. कोणी आव्हानाची भाषा करत असेल तर आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.