Nashik News, 1 August : महाविकास आघाडीच्या जागावाटपा संबंधित महत्वाची बैठक 7 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. तसेच या बैठकीला तिन्ही पक्षांचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती बुधवारी (31 जुलै) रोजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या बैठकीबाबतची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली होती. मात्र,आता जागा वाटपाबाबतची बैठक पार पडण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने नाशिक पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
ठाकरेंच्या या निर्णयामुळे आता आघाडीत नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. शिवाय ठाकरे गट विधानसभेप्रमाणे आता लोकसभेलाही आघाडी धर्म न पाळता आपल्या मर्जीने निर्णय घेणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपादरम्यान शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने थेट सांगलीत जाऊन सांगली लोकसभा मतदारसंघासाठीचा आपला उमेदवार जाहीर केला होता. महाविकास आघाडीमधील जागावाटप जाहीर झालं नसताना ठाकरेंच्या या निर्णयामुळे आघाडीत बिघाडी होणार की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं.
ठाकरे गटाच्या या निर्णयाला आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने कडाकडून विरोध केला होता. यानंतर राज्यात बरंच महाभारत घडलं आणि लोकसभेच्या निवणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेसाठीही महाविकास आघाडील सर्व पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोर जाणार असल्याचं आघाडीतील नेत्यांकडून सांगितलं जात आहे.
यासाठी जागावाटपासंदर्भातील बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. याबाबतची बैठक 7 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. मात्र, या बैठकीच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात नाशिकच्या उमेदवारांबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक (Nahik) पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेआधीच ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे आगाडीत बिघाडी होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.