पुणे : दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट पुण्यात आले. शिंदेशाही पगडी घालून एकनाथ शिंदे यांचे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, किरण साळी, अजय भोसले, विजय शिवतारे उपस्थित होते. हडपसर येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि लगेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांच्या धावत्या भेटीचाही पुण्यातील शिवसेनेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. फक्त काही मिनिटेच मुख्यमंत्री शिंदे पुण्यात होते. मात्र या धावत्या भेटीनंतर पुणे शहरात शिवसेनेला खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी आज (१० जुलै) राजीनामा देणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील.
किरण साळी यांच्यासह पुणे शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे देखील राजीनामा देणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ते राजीनामा देतील. याआधी देखील सकाळ' ने, शिवसेना पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची खात्री पूर्वक माहिती दिली होती.
एकनाथ शिंदेंनी पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. महराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा मान मला मिळाला. या पदाचा वापर मी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी करेल, राज्य सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करेल. महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलेलो ५० आमदार दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदूत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे. या राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी, राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करु, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.