उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदाराला झटका ; तानाजी सावंत यांना पदावरून हटवलं

युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची हकालपट्टी करत नवे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून बालाजी चौगुले यांची नियुक्ती केली आहे.
Shiv Sena MLA Tanaji Sawant
Shiv Sena MLA Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हटविण्यात आले आहे. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम-परंडा मतदार संघांचे आमदार आहेत. (Tanaji Sawant news update)

एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेपासून दूर ठेवण्याचा पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांची सोलापुरचे नवे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे

युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची हकालपट्टी करत नवे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून बालाजी चौगुले यांची नियुक्ती केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अचानक पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन झाले आहे. लवकरच या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

Shiv Sena MLA Tanaji Sawant
भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड ; सोने, चांदीच्या मूर्ती अन् रोख रक्कम

सोलापुरातील माजी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे आणि माजी शिवेसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्यास तानाजी सावंत हे सोलापूरचे पालकमंत्री होऊ शकतात, असा विश्वास ही व्यक्त करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्जून खोतकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com