Sushma Andhare & Devyani Pharande Sarkarnama
पुणे

Shivsena: 'गल्लीबोळातील नेत्या' म्हणणाऱ्या फरांदेंना अंधारेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Sushma Andhare: आमदार फरांदेची भाषा सातत्याने बदलत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आमदार देवयानी फरांदे यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देतो हे कळत नाही. ज्यांना माझ्याशी थेट भिडता येत नाही, ते असे एका एकाला शिकून पुढे करत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आपल्यावर आरोप केले होते. म्हणून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली आहे. यावर तुमचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. मी तो तपासून योग्य तो निर्णय घेईन, असे उत्तर विधानसभा अध्यक्षांनी दिले.

त्यामुळे आमदार फरांदे यांनी अंधारे यांच्या विरोधातील हक्कभंग अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. मात्र नागपूर अधिवेशानाची सांगता झाल्याने या हक्काभंगाच्या प्रस्तावावर सध्या तरी कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या हक्कभंगावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणल्या, आमदार फरांदेची भाषा सातत्याने बदलत आहे. पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने सभागृहाच्या पटलावर बोलताना त्या "शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे_ असा उल्लेख करतात. तर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या "शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे" असा उल्लेख करतात आणि तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा बोलताना त्या "गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे" असा उल्लेख करतात.

मी गल्लीबोळातील माणूस असेल तर मग सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझ्या नावावर चर्चा का करावीशी वाटते ? तुमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागच्या वर्षीच्या त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये माझा राजीनामा का मागावासा वाटला असा सवाल अंधारे यांनी फरांदे यांना केला आहे. अंधारे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर फरांदे काय भूमिका घेणार याकडे आता भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Chaitanya Machale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT