Sushma Andhare News : सुषमा अंधारे कडाडल्या, ‘सुहास कांदे, तुम्ही अजुन ताईगिरी पाहिली नाही’

Shivsena Politics, Sushma Andhare warns Shinde Group MLA Suhas Kande-काळे झेंडे दाखविण्याऱ्या शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा चागंलाच समाचार घेतला.
MLA Suhas Kande & Sushma Andhare
MLA Suhas Kande & Sushma AndhareSarkarnama

Shivsena Vs Suhas Kande : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल महासकंल्प यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे गटाचे आमदार यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान दिले. यावेळी त्यांनी कांदे दादागिरी करीत असतील, मात्र त्यांनी अजून ताईगिरी पाहिलेली नाही, असा इशारा दिला. (Shivsena`s Sushma Sandhare`s Public meeting got huge response in Manmad)

शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) (Uddhav Thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांचा समाचार घेतला. एव्हढेच नव्हे त्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या प्रयत्नांची देखील त्यांनी खिल्ली उडवली.

MLA Suhas Kande & Sushma Andhare
Hemant Patil News : खासदारकीचा राजीनामा दिला अन् हेमंत पाटील दिल्लीत उपोषणाला बसले

सुषमा अंधारे सभेसाठी मनमाड येथे जात असताना, आमदार कांदे यांच्या कार्यालयाबाहेर त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. त्याची अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, काल जी सभा झाली, त्यात सुहास कांदे यांनी बालिश चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की सुषमा अंधारे काम थांबवेल. पण हा त्यांचा भेदरटपणा आहे. त्यांचा प्रयत्न काही सफल झाला नाही. त्यांनी जे घडवले, त्यातील सर्व दोनशे रुपये रोजाचे भाडोत्री लोक होते. त्यांचा कार्यक्रम देखील भाडोत्रीच होता.

त्यानी आमदार कांदे यांना थेट आव्हानच दिले. त्या म्हणाल्या, त्यांना वाटत असेल, की आपण दादागिरी करू शकतो. तसे काही असेल तर त्यांनी अजून ताईगिरी बघितली नाही. दादागिरी पेक्षा ताईगिरी मोठी आहे. फक्त आम्ही उथळ होत नाही. अन्यथा त्यांना उत्तर दिले तर, त्यांची काय अवस्था होईल, हे सांगता देखील येणार नाही.

मनमाड येथे होणाऱ्या अंधारे यांच्या सभेची विरोधकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. त्यामुळे पडद्यामागून सुत्रे हलवत या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्याचा प्रयत्न झाला. त्यावर अंधारे यांनी ‘लावरे तो व्हिडिओ’ म्हणत, कांदे यांच्या विरोधातील व्हिडिओ दाखवले जातील, असा सुचक इशारा दिला. गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न करणारे आमदार कांदे विटाळ कधीपासून मानायला लागले?, असा प्रश्न त्यांनी केला.

MLA Suhas Kande & Sushma Andhare
Uddav thackeray : उद्धव ठाकरे पाहतायेत अजित पवारांच्या उत्तराची वाट!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com