Kishor Tambe
Kishor Tambe Sarkarnama
पुणे

Pune Crime News : धक्कादायक घटना! बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू

सरकारनामा ब्युरो

Local Body Election News : जु्न्नर बाजार समितीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेल्या एका उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. संबंधित उमेदवाराचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या घराजवळील विहिरीत आढळला. यामुळे जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

किशोर कोंडिभाऊ तांबे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या बाजार समिती निवडणुकीचे उमेदवाराचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहितीनुसार, तांबे हे गुरुवारी (ता. ६) रात्री शेतात गेले होते. त्यापूर्वी त्यांनी शेतात चाललो असल्याचे घरी सांगितले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते त्यांचा शोध लागला नाही.

त्यानंतर नातेवाईकांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तांबे बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, नातेवाईकांनी तांबे यांचा रात्रभर शोध घेतला. त्यानंतर आज सकाळपासूनही शोधकार्य सुरूच होते. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास घराजवळील विहिरीत तांबे यांचा मृतदेह आढळला. हात पाय बांधून त्यांना पोत्यात भरण्यात आले होते. तसेच पोत्याला दगड लावून त्यांचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने यामागे राजकारण आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी उमेदवाराची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, तांबे यांनी बाजार समिती निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली होती. परंतु अशा प्रकारे त्यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT