Dipali Sayyad News : माजी स्वीय सहाय्यकांविरोधात दिपाली सय्यद यांची पोलिसांत धाव; काय आहे प्रकरण?

Bhausaheb Shinde : दिपाली सय्यद यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
Dipali Sayyad
Dipali Sayyad Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता.

आता या आरोपानंतर दिपाली सय्यद यांनी स्वतःहून मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे.

माजी स्वीय सहाय्यकांनी काय आरोप केले होते?

दिपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक यांनी केला होता. सामुदायीक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

Dipali Sayyad
Jitendra Awhad : रॅप साँग करणाऱ्या दोघांना अटक; जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त करत केली थेट मोठी घोषणा

या बोगस लग्नातून त्यांनी अनेक लोकांना फसविल्याचा आरोही माजी स्वीय सहाय्यकांनी केला होता. दिपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला. ट्रस्टच्या खात्यात फक्त नऊ हजार होते, मग कोट्यवधी रुपये कोठून आले?, असे गंभीर आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केले होते.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.