Religion Conversion News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: धक्कादायक! ख्रिश्चन धर्मांतराचा सहा महिन्यांत दुसरा प्रयत्न : पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Religion Conversion News: ख्रिश्चन धर्मांतराच्या प्रयत्नाचे लोण आळंदी, दिघीतून आता थेट रहाटणीपर्यंत...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण करून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचा खळबळजनक प्रयत्न श्रीक्षेत्र आळंदी व पिंपरी-चिंचवडमध्ये दिघी परिसरात यावर्षी जानेवारी महिन्यात झाला. त्याबाबत धार्मिक व्देष निर्माण केल्याचा, धार्मिक प्रचार, प्रसार केल्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आता अशीच घटना पुन्हा घडल्याने उद्योगनगरीत खळबळ उडाली आहे.

याप्रकरणीही घरात अनाधिकाराने घुसून मनपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वाकड पोलिसांनी दाखल केला आहे. अगोदरच्या आळंदी आणि दिघीच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या प्रयत्नांच्या घटनांत मुर्तीपूजा म्हणजे सैतानाची पूजा आहे, असे सांगत त्यातील तिन्ही कन्वहर्टेड ख्रिश्नन आरोपी हे धर्मांतर करा, असे सांगत होते.

त्यानंतर आता पुन्हा ख्रिश्चन धर्मातच धर्मांतराचा प्रयत्न नुकताच उद्योगनगरीत रहाटणीत उघडकीस आला. त्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील फिर्यादी या महिलाच आहेत.

त्यांच्या घरी आरोपी महिला या १५ दिवसांपूर्वी गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्माची पुस्तके वाचून दाखविण्यास सुरवात केली. मात्र, हे काही समजत नाही, असे सांगून त्याला फिर्यादींनी विरोध केला. तसेच पुन्हा येऊ नका, असेही आरोपींना बजावले. तरीही त्या पुन्हा १ जुलैला आल्या. पुन्हा त्यांनी चर्चेसचे फोटो दाखवित पुन्हा माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्यांना विरोध केला गेला.

तरीही त्या पुन्हा १० तारखेला आल्या. पुन्हा धार्मिक पुस्तक दाखवून ख्रिश्चन धर्म माना अशी जबरदस्ती केली. फिर्यादींनी पुन्हा त्यांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. परंतू त्या गेल्या नाहीत. तसेच फिर्यादींना बाहेर जाऊ दिले नाही.

नाईलाजाने मग पोलिसांना बोलवावे लागले. याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. कारण याप्रकरणी क्रॉस कंप्लेट झाली असून तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT