Maharashtra Politics: राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी अजितदादांची संपर्क मोहीम?

NCP Crisis News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होण्यासाठी अजितदादांचे प्रयत्न
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Political News: काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत.

तर अजित पवार यांच्या गटाला प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांसह चाळीस आमदारांचं समर्थन असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे.

तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावाही ठोकला आहे. या घडामोडी सुरू असतानाच आता पक्षाच्या विस्तारासाठी जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीही सुरु केली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहूर्तावरच काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता? मंत्रिपदाचा त्याग करावा लागण्याची शक्यता

अजित पवार यांनी उपमख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची अजित पवार सत्तेत आल्यामुळे अस्वस्थता वाढली होती. यातील अनेक जणांना पवार सत्तेत येण्याने मंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार आहे. पण असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हेच या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजती आहे.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील काही नेत्यांनी सत्तेची कास धरण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. पण ऐनवेळी राजकीय गणितं बदलली अन् शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यामुळे आमदारकी मिळाली, पण सत्ता नाही अशी गत या आमदारांची झाली होती.

Ajit Pawar
Rohit Pawar News : 'आमदाराला धमकी देऊन, मारून मुटकून घेऊन जात असतील तर...'; रोहित पवारांचा मोठा आरोप

पण अडीच वर्षांत महाविकास आघाडीला सुरुंग लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (शिवसेना) आणि भाजप सत्तेत आले. त्यामुळे अनेक भाजपवासी आमदारांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, अजित पवार यांच्या गटाने भाजपसोबत सत्तेत सामील होऊन अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे अनेक भाजपवासी झालेले आमदार मंत्रिपद मिळणार नसल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता येणाऱ्या काळात पक्षाच्या विस्तारासाठी अजित पवार हे त्यांना संपर्क करीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत.

Ajit Pawar
Ad.Ujjwal Nikam News : सबळ कारण दिले तर आमदारांना मुदतवाढ देण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार..

कोणते नेते राष्ट्रवादी सोडून गेले?

- शिवेंद्रराजे भोसले : सातारा

- गणेश नाईक : नवी मुंबई

- बबनराव पाचपुते : श्रीगोंदा

- राणा जगजितसिंह पाटील : तुळजापूर, उस्मानाबाद

- विजयसिंह मोहते पाटील : अकलूज

- चित्रा वाघ : माजी महीला प्रदेशाध्यक्षा

- उदयनराजे भोसले : सातारा

- दिलीप सोपल : बार्शी

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com