DRDO Scientist Pardip Kurulkar :
DRDO Scientist Pardip Kurulkar :  Sarkarnama
पुणे

DRDO News : 'रॉ'च्या तपासात धक्कादायक बाबी? ; कुरूलकरांनी पाकीस्तानला माहिती पुरवली!

सरकारनामा ब्यूरो

DRDO Scientist Pardip Kurulkar Arrest in Pune : देशाची संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पुरवणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञाकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक संचाचे ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेने तांत्रिक तपासणी सुरू केले आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याबाबत संशय आल्यानंतर चौकशी सुरू केली. तसेच, त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले होते. या चौकशीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या न्यायवैद्यक तपासणीत डॉ. कुरुलकर याने पाकिस्तानी हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याचे समोर आले होते. त्यानंतर ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले.

मुंबई एटीएसने (ATS) डॉ. कुरुलकर याला अटक केली. न्यायालयाने डॉ. कुरुलकर याला येत्या मंगळवारपर्यंत (ता.९) एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) गुप्तचर यंत्रणेनेही डॉ. कुरुलकर याची चौकशी सुरू केली आहे.

डॉ. कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांच्या संपर्कात होते. ते परदेशात पाकिस्तानी गुप्तचरांना भेटल्याचेही समोर आले आहे. ते पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, तसेच त्यांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला (पीआयओ) कोणती माहिती दिली. तसेच, ते देशात आणखी कोणाच्या संपर्कात होते, याबाबत तपास करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT