Ajit Pawar On SC Hearing
Ajit Pawar On SC Hearing Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? अजितदादा म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Pune : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत गुरुवारी(दि.११) सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. यावेळी न्यालयाने शिंदे फडणवीस सरकारला अभय दिलं आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा सरकार आणलं असतं अशी टिप्पणी केली. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन शिंदे फडणवीसांना चिमटा काढला आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा शिंदे फडणवीस सरकारला काही परिणाम होणार नव्हता हे आधीच मी स्पष्ट केलं आहे. कारण १६ आमदार जरी अपात्र ठरले असते तरी त्यांच्याकडं बहुमत होतं. त्यामुळे हे सरकार टिकणारच होतं हे मी आधीच स्पष्ट केलं होतं असंही अजित पवार(Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

वाजपेयींची उंची आणि आताच्या...

नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणार का या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी शिंदे गटासह भाजपला टोला लगावला. पवार म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची यात जमीन आस्मानाचा फरक आहे. ते अजिबात राजीनामा देणार नाही.कुणी मनात पण आणू नका. राजीनामा मागून वगेरे काही उपयोग होणार नाही. कारण जे स्वप्नांत शक्य नाही ते प्रत्यक्षात कधी होणार असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कोश्यारींना टोला...

राज्यपालांच्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, तत्कालीन राज्यपाल निश्चितच जबाबदार आहे. पण राज्यपाल यांसारख्या महत्वाच्या पदावर बसल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपली मागची पार्श्वभूमी कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा यत्किंचितही विचार न करता पारदर्शीपणे वागलं पाहिजे. तटस्थपणे निर्णय़ घ्यायला हवा. पण असं होताना दिसत नाही असा टोला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांना टोला लगावला.

तसेच काँग्रेसप्रणित यूपीए सरकार, काँग्रेस सरकार आणि आत्ताच्या सरकारच्या काळातही देशातील अनेक राज्यांत अशा घटना समोर आले आहेत. पण सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी एकत्र बसून किरकोळ बदल करुन असे प्रसंग पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही या करिता प्रयत्न करायला हवा असंही पवार यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीकडूनच जर तो विषय...

आमच्या त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिला. पण तो मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला. राजीनामा दिल्यावरच ते सांगितलं गेलं. बरं दिला तर लगेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. याला मी अजिबात कोणा एकाला दोषी धरणार नाही.

महाविकास आघाडीकडूनच जर तो विषय त्याचवेळेस धसास लागला असता आणि नवीन अध्यक्षाची निवड झाली असती तर हा प्रश्नच उद्भवला नसता. पण तो मार्गी न लागल्यामुळे अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्षच सभागृहाचे काम पाहत होते. मात्र, हे सगळं घडल्यानंतर शिंदे फडणवीसांनी लगेच विधानसभा अध्यक्षाचं पद भरलं. पण हेच जर अगोदर ती जागा भरलेली असती तर त्या अध्यक्षांनी १६ बंडखोर आमदारांना अपात्र केलं असतं असं मतही पवार यांनी व्यक्त आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT