Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी (ता. १९) फोडण्यात आला. बारामतीतील कन्हेरी गावातील मारुतीच्या मंदिरातून परंपरेनुसार सुळेंचा प्रचार सुरू करण्यात आला. या वेळी पवार कुटुंबातील झाडून सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उणीव जाणवल्याचे त्यांचे बंधू श्रीनिवास पवारांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते शरद पवारांची Shaard Pawar साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला हात दिला. त्यानंतर बारामती लोकसभेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजितदादांनी पवारांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे बारामतीत नणंद-भावजय अशी लढत होत आहे. परिणामी प्रत्येक निवडणुकीवेळी सोबत असणारे अजित पवार हे सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडताना नव्हते. याची खंत त्यांचे बंधू श्रीनिवास पवारांनी व्यक्त केली.
कन्हेरी येथे सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर श्रीनिवास पवारांनी Shrinivas Pawar प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडताना आम्ही सर्वजण असतो. या वेळी कुटुंबातील एक व्यक्ती नाही, त्यांचे थोडेसे दुःख आहे. पण विजय शेवटी सत्याचाच होणार, असेही श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, काटेवाडी येथील छोट्याखानी झालेल्या सभेत श्रीनिवास पवारांनी अजितदादांवर सडकून टीका केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अजित पवारांनीही यापूर्वी कुटुंब कधी प्रचारात उतरले नव्हते, आता मात्र पायाला भिंगरी बांधल्यासारखे सर्वजण फरत असल्याचे सांगितले होते.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.